News Flash

अमित ठाकरेंच्या राजकारणातील एंट्रीबाबत रोहित पवार म्हणतात…

मनसेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची नेतेपदी एकमताने निवड

(रोहित पवार आणि अमित ठाकरे यांचे संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे आता सक्रीय राजकारणात उतरलेत. काल(दि.२४) मनसेच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात अमित ठाकरे यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही अमित ठाकरे यांच्या राजकारणातील पदार्पणावर प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार यांनी अमित ठाकरेंना शुभेच्छा देताना, ‘आमच्यात राजकीय मतभेद असले तरी राज्याच्या हितासाठी गरज असेल तेव्हा मित्र म्हणून एकमेकांना व्यक्तीगत पातळीवर कायम सहकार्य करु’, असं म्हटलं. “महाराष्ट्र नवनिर्माण सेने’च्या नेतेपदी निवड झाल्याबद्दल अमित राज ठाकरे यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांना भावी कार्यासाठी शुभेच्छा. आमच्यात राजकीय मतभेद असले तरी जनतेच्या आणि राज्याच्या हितासाठी गरज असेल तिथे मित्र म्हणून व्यक्तीगत पातळीवर एकमेकांना कायमच सहकार्य राहील” असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

आणखी वाचा – महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढणं सुडबुद्धीनं घेतलेला निर्णय : रोहित पवार

यापूर्वीही रोहित पवार आणि अमित ठाकरे या दोघांची लोअर परळ येथील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. त्यावेळी राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरु झाल्या होत्या. मनसे म्हणजे राज ठाकरे असं समीकरण गेले अनेक वर्ष होतं. मात्र, आता स्वत: अमित ठाकरे राजकारणात सक्रीय होत असल्याने मनसेला एक मोठा नेता मिळणार आहे. अमित ठाकरे यांच्या रुपाने ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीतील आणखी एक व्यक्ती आता राजकारणात उतरला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2020 1:50 pm

Web Title: ncp mla rohit pawar wishes mns leader amit thackeray after his official entry in politics during mns adhiveshan sas 89
Next Stories
1 फोन टॅपिंगप्रकरणाची चौकशी होणार; गृहमंत्र्यांचे आदेश
2 महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढणं सुडबुद्धीनं घेतलेला निर्णय : रोहित पवार
3 शांततेच्या मार्गाने बंद करा, प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन
Just Now!
X