25 January 2020

News Flash

पन्हाळा गडावर रोमँटिक गाणं शूट करण्यावरुन ट्रोल करणाऱ्यांना अमोल कोल्हेंचं उत्तर

अमोल कोल्हे यांनी 'मराठा टायगर्स' चित्रपटातील एका गाण्यासाठी पन्हाळा गडावर गाण्याचं शुटिंग केलं होतं

राज्यातील गड किल्ल्यांवर हेरिटेज हॉटेल, रिसॉर्ट तसंच लग्नसमारंभ, मनोरंजन कार्यक्रमांसाठी उपलब्ध करुन देण्याच्या निर्णयावर खासदार अमोल कोल्हे यांनी टीका केली होती. मात्र यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. पन्हाळा गडावर रोमॅण्टिक गाणं शूट करण्यावरुन नेटकऱ्यांनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली होती. अमोल कोल्हे यांनी या टीकाकारांना उत्तर दिलं असून त्या गाण्याचा गडकिल्ल्याच्या निर्णयाशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

अमोल कोल्हे यांनी २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मराठा टायगर्स’ चित्रपटातील एका गाण्यासाठी पन्हाळा गडावर गाण्याचं शुटिंग केलं होतं. गडावर शूट केल्याने याआधीही त्यावर आक्षेप घेण्यात आला होता. मात्र यावेळी गड किल्ल्यांचा विषय पुन्हा समोर आल्याने टीकाकारांनी तुम्हाला गडांची इतकी काळजी आहे तर मग तिथे रोमँटिक गाण्याचं शुटिंग का केलंत ? अशी विचारणा करण्यास सुरुवात केली होती.

अमोल कोल्हे यांनी उत्तर देताना सांगितलं आहे की, “त्या चित्रपटाच्या विषयाचा आणि गड किल्ल्यांसंबंधी घेण्यात आलेल्या निर्णयाचा काही संबंध नाही. मत व्यक्त करण्याआधी विषय समजून घेणं गरजेचं आहे,”. भंडाऱ्यात राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

अमोल कोल्हे यांनी टीका करणाऱ्यांना उगाच उथळपणे कमेंट करु नयेत असं आवाहनदेखील केलं आहे. उगाच वाद निर्माण करत संबंध जोडला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान गड किल्ल्यांवर रिसॉर्ट, हॉटेल उभारण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर महाराष्ट्रातला शिवप्रेमी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे.

First Published on September 11, 2019 12:59 pm

Web Title: ncp mp amol kolhe panhala fort maratha tigers maharashtra fort sgy 87
Next Stories
1 ‘भिडे गुरुजींची इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करा’; पंतप्रधान मोदींना पत्र
2 पुणे : पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
3 राजीनाम्याचे दिल्लीत पडसाद : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांना सोनिया गांधींनी बोलावलं
Just Now!
X