24 September 2020

News Flash

“महाराष्ट्र याला सहमत नाही,” सुप्रिया सुळे यांनी लोकसभेतील चर्चेदरम्यान केलं स्पष्ट

जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयकावर लोकसभेत चर्चा

संग्रहित

केंद्र सरकारकडून मंगळवारी लोकसभेत कृषी क्षेत्रातील सुधारणांशी संबंधित तीन विधेयकं सादर करण्यात आली. कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही विधेयकं मांडली. यामध्ये जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक २०२० चाही समावेश होता. लोकसभेत विधेयकावर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यावेळी विधेयकाचे आम्ही समर्थन करीत नाही असं स्पष्ट केलं.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत लोकसभेतील आपल्या भाषणाची व्हिडीओ क्लिप शेअर केली आहे. यावेळी त्यांनी सांगितलं आहे की, “लोकसभेत जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) विधेयक २०२० संदर्भातील चर्चेत सहभाग घेतला. यावेळी या विधेयकाच्या अनुषंगाने असलेले आक्षेप सभागृहात मांडले. या विधेयकाचे आम्ही समर्थन करीत नाही”.

सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना सभागृहाला सांगितलं की, “या विधेयकाच्या संदर्भात केंद्र सरकारने महाराष्ट्रासह इतर राज्यांची संमती घेतली आणि मुख्यमंत्री या प्रारुपास संमत आहेत असा उल्लेख केला आहे. परंतु जेव्हा मी तपासणी केली तेव्हा ही संमती यापुर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी दिली होती. महाराष्ट्र याला सहमत नाही”.

“ज्या बैठकीचा या विधेयकाच्या अनुषंगाने केंद्र सरकार संदर्भ देत आहे त्यामध्ये कृषी मुल्यनिर्धारण आयोगाच्या मुद्यांबाबत चर्चा केली होती का?,” असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी यावेळी विचारला. तसंच ज्या असामान्य परिस्थितीत सरकार हा कायदा लागू करणार आहे त्याचा फॉर्मुला देखील केंद्राने राज्यांना दिलेला नाही असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी विधेयकांच्या तरतुदीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला अधिक किंमत मिळेल तसंच कृषी क्षेत्रातील खासगी गुंतवणूक वाढेल असा दावा केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 12:41 pm

Web Title: ncp mp supriya sule essential commodities amendment bill lok sabha sgy 87
Next Stories
1 ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांची करोनावर मात
2 त्यावेळी चित्रपटसृष्टीत मराठी लोकांना घाटी संबोधलं जायचं : उर्मिला मातोंडकर
3 चिकू उत्पादनात प्रचंड घट
Just Now!
X