News Flash

निकाल लागल्यापासून भाजपा नेते मोकाट सुटले आहेत – नवाब मलिक

'कारवाई होत नाही तोपर्यंत गुजरात राज्यात तीव्र आंदोलन केले जाईल'

महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या भाजपा आमदार बलराम थवानी यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत गुजरात राज्यात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिला आहे. गुजरातमधील नरोडा येथील राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी यांना मारहाण करण्यात आली. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी हा इशारा दिला.

भाजपा आमदाराची दादागिरी, महिलेला मारल्या लाथा

भाजपाचं सरकार आल्यावर भाजपाचे कार्यकर्ते व नेते मोकाट सुटले आहेत. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत आहेत. म्हणजे कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही. देशात कायद्याचे राज्य नाही तर भाजपचे राज्य आहे हे सिद्ध होते. या घटनेचा आम्ही निषेध करतो असेही नवाब मलिक म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलेला झालेल्या मारहाणप्रकरणी गुजरात सरकारने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

काय आहे घटना ?
नरोडामधील भाजपा आमदार बलराम थवानी यांनी एका महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नीतू तेजवानी असे जखमी महिलेचे नाव असून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वॉर्ड प्रमुख आहेत. बलराम थवानी आणि त्यांचे समर्थक महिलेला मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 5:07 pm

Web Title: ncp nawab malik bjp mla balram thavani
Next Stories
1 शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या पायल रोहतगीला अटक करा – नवाब मलिक
2 पुढच्या वेळी कोण मुख्यमंत्री असेल?; पंकजा मुंडेंनी व्यक्त केला विश्वास
3 भाजपाचे यश पहायला आज गोपीनाथ मुंडे हवे होते – मुख्यमंत्री
Just Now!
X