News Flash

“अहंकार कसा असावा हे पंतप्रधान मोदींकडून शिकतोय”

"कोणाला किती अहंकार आहे हे लोक पाहत आहेत"

संग्रहित (PTI)

कोणाला किती अहंकार आहे हे लोक पाहत आहेत. आमचे लोक जमिनीवर असून भाजपाचा अहंकार लोकांनी पाहिला आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे. अहंकार कसा असावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिकत असल्याचा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. टीव्ही ९ ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

नवाब मलिक यांनी यावेळी विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना टोला लगावला. दरेकर जॅकेट घालून टीव्हीसमोर येतात. याला सरकारला घेरणं म्हणत नाहीत असं ते म्हणाले आहेत. “प्रवीण दरेकर आरसा पाहून जॅकेट घालून येतात. आरशासमोर पाहून टीव्हीसमोर येतात. याला घेरणं म्हणत नाहीत. ही खालच्या पातळीवर जाऊन प्रसिद्धीसाठी करण्यात आलेली धडपड असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे. “काही विरोधी पक्षनेते तर कार्यालयात बसून केवळ प्रतिक्रिया देण्याचं काम करत आहेत,” असाही टोला त्यांनी लगावला.

आणखी वाचा- “सरकारी यंत्रणांवर ताण आहे हे मान्य, पण म्हणून…,” नाशिक आणि विरार दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा संताप

विरारमधील दुर्घटनेवर बोलतान नवाब मलिक यांनी हे पालिकेचं किंवा शासकीय रुग्णालय नाही सांगताना चौकशीअंती सत्य बाहेर येईल असं म्हटलं आहे. खासगी रुग्णालयाच्या चुकीसाठी सरकारला दोष देणं योग्य नसल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 2:51 pm

Web Title: ncp nawab malik on bjp pm narendra modi pravin darekar sgy 87
Next Stories
1 “महाविकासआघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय!”; दरेकरांची जोरदार टीका
2 VIDEO: नाशिकमधील ऑक्सिजन गळतीचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
3 समजून घ्या : दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी कसा मिळवाल ई-पास!
Just Now!
X