25 January 2021

News Flash

जावयाला अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

नवाब मलिक यांचं ट्विट

अल्पसंख्यांक विकासमंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अमलीपदार्थ विरोधी पथकाने बुधवारी अटक केली. ड्रग्ज प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालावर कारवाई करण्यात आल्यानंतर नवाब मलिक यांचं नाव समोर आलं होतं. समीर खान यांना समन्स बजावत चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. समीर खान हे नवाब मलिक यांची मुलगी निलोफर यांचे पती आहेत.

मुच्छड पानवाल्यामुळे नवाब मलिक यांचा जावई अडचणीत; एनसीबीने बजावलं समन्स

दरम्यान जावयाला अटक झाल्यानंतर नवाब मलिक यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “कोणीही कायद्यापेक्षा मोठं नाही आणि कोणताही भेदभाव न करता प्रत्येकाला ही गोष्ट लागू असावी. कायदा आपलं काम करेल आणि न्याय होईल. मी न्यायव्यवस्थेचा आदर करत असून त्यावर पूर्ण विश्वास आहे”.

काय आहे प्रकरण
एनसीबीने वांद्रे येथून ब्रिटीश नागरिक करण सजनानी आणि बॉलीवूड अभिनेत्रीची पूर्व मॅनेजर राहिला फर्निचरवाला यांना गांजासह अटक केली होती. यावेळी करण सजनानी याच्याकडून मुच्छड पानवाल्याला गांजा पुरवला जात होता अशी माहिती चौकशीत समोर आली. राहिला फर्निचरवालासुद्धा मदत करत होती असं एनसीबीचं म्हणणं आहे. यानंतर एनसीबीकडून सोमवारी मुच्छड पानवाल्याची चौकशी करण्यात आली आणि नंतर अटकेची कारवाई झाली.

तपासादरम्यान करण सजनानी आणि समीर खान यांच्यात गुगल पेच्या माध्यमातून २० हजारांचा व्यवहार झाला असल्याचं समोर आलं. ड्रग्जसाठी हा व्यवहार झाल्याचा एनसीबीला संशय आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2021 12:15 pm

Web Title: ncp nawab malik tweet after son in law sameer khan arrested by ncb sgy 87
Next Stories
1 धनंजय मुंडे प्रकरणी संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले
2 “पोलिसांनी तात्काळ…,” धनंजय मुंडेंवरील बलात्काराच्या आरोपांवर फडणवीसांची प्रतिक्रिया
3 जिवलग मित्र धनंजय मुंडेंवर होणाऱ्या बलात्काराच्या आरोपावर अमोल कोल्हेंनी सोडलं मौन; म्हणाले…
Just Now!
X