सीट बेल्ट दरवाजात अडकल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. ही घटना अहमदनगर येथे घडली. शरद पवार यांच्यासह हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. काही क्षण घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासन हवालदिल झाले होते.
एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार हे नगर येथे आले होते. कार्यक्रमानंतर पुण्याला जाण्यासाठी ते हेलिकॉप्टरमध्ये बसले. हेलिकॉप्टरने उड्डाण केले. काही क्षणात पायलटला सीट बेल्ट दरवाजात अडकल्याचे लक्षात आले. त्याने लगेच हेलिकॉप्टर खाली उतरवले. सीट बेल्ट व्यवस्थित लावून हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले. नगरच्या हेलिपॅडवर ही घटना घडली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 30, 2018 6:31 pm