भाजपाला कोणत्याही परिस्थिती पाठिंबा द्यायचा नाही, हे मी आधीच स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, त्यानंतरही भाजपाला पाठिंबा देण्यात आला. प्रदेशाध्यक्षांचा आदेश नाकारणाऱ्यांना नोटीस पाठवली असून येत्या ५ दिवसांत संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांसमोर बोलताना दिली.
नगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, नगर महापालिका निवडणुकीनंतर इथले आमदार मला भेटायला आले होते. त्यावेळी मी त्यांनी मला संपूर्ण परिस्थिती सांगितली. तसेच शिवसेनेबाबतही मला त्यांनी सांगितले. मी त्यांना त्याचवेळी आपण वेगळा विचार करू. पण कोणत्याही परिस्थितीत भाजपाबरोबर जायचे नाही, हे मी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. त्यानंतरही भाजपाला पाठिंबा दिल्याचे मला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. येत्या चार ते पाच दिवसांत पक्षाची बैठक होईल. त्यात याबाबत निर्णय घेतला जाईल. पक्षादेश न ऐकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. लवकरच याबाबत समजेल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 30, 2018 2:37 pm