News Flash

मंत्रिमंडळात संधी दिली तर त्याचं सोनं करेन – रोहित पवार

"मंत्रिमंडळात संधी द्यायची की नाही हा पक्षाचा निर्णय आहे"

संग्रहित छायाचित्र

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच एक-दोन दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असे सांगितले जात होते. परंतु मंत्रिमंडळात कुणाचा समावेश करायचा, याबाबत अजून काँग्रेसची चर्चा सुरू असल्याने विस्तार लांबणीवर पडला आहे. दरम्यान मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. रोहित पवार यांनी यासंबंधी बोलताना जर मला मंत्रिमंडळात संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन अशी प्रतिक्रिया दिली आहे.

“मंत्रिमंडळात संधी द्यायची की नाही हा पक्षाचा निर्णय आहे. पण जर मला संधी दिली तर मी त्याचं सोनं करेन. इतरही आमदार महत्वाचे असून अपेक्षा न ठेवता मी काम करतोय. मी माझ्या जिल्ह्यावर अन्याय होऊ देणार नाही”, असं रोहित पवार यांनी सांगितलं आहे. “काम करणाऱ्यांना संधी दिली पाहिजे असं लोकांना वाटत असतं. तशी जबाबदारी आपल्याला दिल्यास आपल्याला ती स्विकारावी लागेल. मी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता सामाजिक आणि व्यवसायिक काम करत असतो,” असंही रोहित पवार यांनी यावेळी सांगितलं.

“पक्ष कोणाही एकाचा नसून तो चालवताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. आपल्याला आवडण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. मला कितीही वाटलं संधी मिळावी तरी पक्षाची काही समीकरणं असतात. पण जर मला संधी मिळाली तर त्याचं सोनं करेन,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २१ डिसेंबरला संपले. त्यानंतर लगेचच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे महाविकास आघाडीतील तीनही पक्षांचे नेते सांगत होते. त्यादृष्टीने काही हालचालीही सुरू झाल्या. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आदी नेते दिल्लीला रवाना झाले. मंत्रिमंडळात कुणाचा समावेश करायचा, तसेच कुणाला कोणती खाती द्यायची, याबाबत अजून काँग्रेसमध्ये चर्चा सुरू आहे. काँग्रेसची यादी अंतिम होत नाही, तोपर्यंत विस्तार होणार नाही, असे सांगितले जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2019 11:16 am

Web Title: ncp rohit pawar mahavikas aghadi cabinet shivsena congress sgy 87
Next Stories
1 बीड जिल्ह्य़ात अपघातात तीन ठार, १५ जखमी
2 पद्मदुर्गावर शिवप्रेमींचा जागर..
3 सर्पमित्र, वन कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने जखमी असलेल्या अजगराला जीवदान
Just Now!
X