राज्यात सध्या पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. बीड जिल्ह्य़ातील परळी वैजनाथ येथील पूजा चव्हाणच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाने थेट शिवसेनेचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेतलं असून राजीनाम्याची मागणी केली जात आहे. एकीकडे भाजपा वारंवार वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना दुसरीकडे शिवसेनेने मात्र या मुद्द्यावर वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीतील इतर नेतेही याप्रकरणी भाजपाला प्रत्युत्तर देत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेना मंत्री; भाजपाने पहिल्यांदाच घेतलं नाव

“चर्चा तर वेगवेगळ्या होत असतात. पण एक सांगतो राज्यात जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल तर त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. त्या मुलीला न्याय मिळेल असा विश्वास मी व्यक्त करतो,” असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

“पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी व्हायरल ऑडिओ क्लिप्सची सखोल चौकशी करा!”
“साहेब तिला जरा समजावून सांगा”, पुण्यातील तरुणी आत्महत्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप व्हायरल

राठोड कुठे आहेत?
बीड जिल्ह्यातील परळी येथील २२ वर्षाच्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. पुण्यातील हडपसर भागातील महमंदवाडी परिसरातील हेवन पार्कमध्ये ही घटना घडली होती. पूजाच्या आत्महत्येची चर्चा सुरू झाल्यानंतर राठोड यांचं नाव या प्रकरणात समोर आलं होतं. भाजपाकडून त्यांचं नाव घेऊन कारवाई करण्याची मागणी केली गेली होती. या प्रकरणात नाव आल्यापासून राठोड अज्ञातस्थळी आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत.