News Flash

“आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा,” रोहित पवारांकडून पंकजा मुंडेंचं जाहीर कौतुक

"राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते"

करोना संकटातही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे दौरे तसंच बैठका सुरु आहेत. मंगळवारी राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा काढण्यात आला. या बैठकीत भाजपा नेत्या पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विट करत शरद पवारांना सलाम केला होता. त्यांच्या या ट्विटवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे यांनी ट्विटमध्ये काय म्हटलं होतं –
“शरद पवार साहेब, hats off… करोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले… पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले, तरी कष्ट करणाऱ्याविषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे,” अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी शरद पवारांच्या कामाबद्दल आदर व्यक्त केला आहे.

आणखी वाचा- “पवार साहेब हॅट्स ऑफ”; पंकजा मुंडेंचा शरद पवारांना सलाम

रोहित पवारांची प्रतिक्रिया –
पंकजा मुंडेंच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांनी एकाप्रकारे विरोधी नेत्यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले आहेत की, “धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा”.

शरद पवारांच्या उपस्थितीत ऊसतोड कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत झालेल्या बैठकीत तोडगा काढत कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. बैठकीला भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे सुद्धा उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2020 11:46 am

Web Title: ncp rohit pawar tweet on pankaja munde after she prasise sharad pawar work sgy 87
Next Stories
1 पुणे पोलिसांना पुन्हा आव्हान; पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्यानंतर PSI च्या नावे बनावट फेसबुक अकाउंट
2 शरद पवारांनी ‘तो’ प्रश्न विचारला आणि आघाडीने माझं तिकीट कापलं; सुजय विखेंचा गौप्यस्फोट
3 शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या हत्येचा कट, जीवे मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी
Just Now!
X