News Flash

भाजपकडून सत्तेचा गैरवापर!

वादग्रस्त विषय बाजूला ठेवून किमान कार्यक्रम तयार करून त्याआधारे ५ वर्षे देशाचा कारभार चालवल्याचे उदाहरण शरद पवार यांनी या वेळी दिले

(संग्रहित छायाचित्र)

शरद पवार यांची टीका :-  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्यामागे केंद्रातील सत्तेचा गैरवापर, राज्यपालांनी संकेत, पद्धती न पाळल्याचे प्रमुख कारण आहे. आता हे सारे घटनेच्या चौकटीत असो वा नसो परंतु, भाजपने सत्ता काबीज करण्याचं हे वेगळेपण देशात आणि आपल्या राज्यातही दाखवून दिल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली.

अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेमागे तुमचाच हात असल्याचा सर्वसामान्यांचा समज असल्याबाबत विचारले असता पवार म्हणाले, की हा गैरसमज तुमचाच असेल. मला, तसे वाटत असते तर मी आपल्या सहकाऱ्यांना तसं सांगितलं असतं. आणि माझ्या सहकाऱ्यांशी एखाद्या प्रश्नावर चर्चा केली तसेच, त्यांना पटवून दिलं तर ते माझ्या सूचनेचा अनादर करीत नसल्याचा अनुभव आहे. त्यामुळे माझा हात असेल असं म्हणणं चुकीचं आहे. ईडी चौकशीच्या दबावातून अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका घेतल्याचा बोलबाला असल्याबाबत विचारले असता, त्याची तुमच्याकडे काही माहिती आहे का, असा प्रतिप्रश्न करून ही शक्यता पवारांनी फेटाळली.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे सरकार येईल याबाबत आपण नि:संकोच असल्याचे स्पष्ट केले, मात्र आम्ही आणि काँग्रेस एका विचाराचे आहोत. शिवसेना निश्चितच वेगळ्या विचाराची असल्याने अशा परिस्थितीत सविस्तर चर्चेअंती वादग्रस्त विषय बाजूला ठेवून किमान मान्यता असलेला कार्यक्रम घेऊन सरकार आणावं लागेल असे पवार यांनी नमूद केले.

सन २००४ मध्ये केंद्रातील अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये जॉर्ज फर्नाडिस, ममता बॅनर्जीसारखे अनेकजण होते की ते जन्मभर भाजपच्या विरोधात वागले. पण, वाजपेयींनी सर्वाना एकत्र बसवलं. वादग्रस्त विषय बाजूला ठेवून किमान कार्यक्रम तयार करून त्याआधारे ५ वर्षे देशाचा कारभार चालवल्याचे उदाहरण शरद पवार यांनी या वेळी दिले. कुणीतरी म्हटलं की आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू. पण, ते कर्ज शेतीचं, पिकाचं, दीर्घ मुदतीचं की काय, किती लोकांची, किती रक्कम. राज्याच्या तिजोरीत तशी तरतूद आहे का? अशा गोष्टींसंबंधी सविस्तर विचार करणं गरजेचं आहे. त्यामुळे चर्चा चालल्याच पाहिजेत आणि पूर्ण विचारांनी निर्णय घेतले गेले पाहिजेत अशी भूमिका पवारांनी मांडली.

उपमुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटलांच्या नावाची चर्चा झाल्यामुळे अजित पवारांनी बंड पुकारल्याचे बोलले जात असल्याबाबत विचारले असता, तशी काही चर्चाही नाही, त्यावरून असे काही झाल्याचे मला पटत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2019 2:59 am

Web Title: ncp sharad pawar bjp akp 94
Next Stories
1 काँग्रेस-राष्ट्रवादीची कसोटी
2 हंगामी अध्यक्षाची निवड सत्ताधाऱ्यांच्या सोयीने!
3 राष्ट्रपती राजवट उठविताना राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीविषयी साशंकता – सुशीलकुमार
Just Now!
X