05 August 2020

News Flash

“छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी”, उदयनराजेंच्या टीकेला शरद पवारांचं उत्तर

खटाव- माण साखर कारखान्याच्या 251001 व्या साखर पोत्याचे पूजन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं

मला कार्यकर्ते ‘जाणता राजा’ म्हणतात. पण मी कोणालाही तसे म्हणायला सांगितले नव्हते, असे शरद पवार एका सभेत म्हणाले...

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचा जाणता राजा असा उल्लेख करण्यावर भाजपा नेते आणि छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आक्षेप घेतल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. शरद पवार यांनी उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा असं त्यांनी सांगितलं आहे. तसंच छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे असं यावेळी ते म्हणाले. खटाव- माण साखर कारखान्याच्या २५१००१ व्या साखर पोत्याचे पूजन शरद पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी शरद पवारांनी उदयनराजेंच्या टीकेला उत्तर दिलं.

“मी कुठेच म्हणालो नाही की मला जाणता राजा म्हणा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा अभ्यास केल्यास त्यांना जाणता राजा असं कुठेही संबोधण्यात आलेलं नाही. जाणता राजा हा शब्द रामदास स्वामींनी आणला. रामदास स्वामी शिवरायांचे गुरु नव्हते. राजमाता जिजाऊ या त्यांच्या गुरु होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामी होते ही लेखणीची कमाल आहे. छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे,” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने वाद निर्माण झाला असताना यावर प्रतिक्रिया देताना उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांचा जाणता राजा असा होणारा उल्लेखही आक्षेपार्ह असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या आधी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील याच मुद्द्यावरुन शरद पवार यांच्यावर टीका केली होती.

आणखी वाचा – ‘जाणता राजा फक्त शिवाजी महाराजच’; उदयनराजेंचा शरद पवारांना टोला

उदयनराजे नेमकं काय म्हणाले होते ?
“शिवाजी महाराजांसारखा एखादाच युगपुरुष जन्माला येतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो. फक्त एकमेव छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, त्यांची प्रतिमा आपण देव्हाऱ्यात ठेवतो. आजही त्यांचं नाव काढलं की चैतन्य निर्माण होतं. प्रेरणा मिळते. अंगाला शहारा येतो. तुलना तर सोडाच, आपण त्यांच्या जवळपासही जाऊ शकत नाही,” असं उदयनराजे यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 3:51 pm

Web Title: ncp sharad pawar bjp udyanraje bhosle janta raja chhatrapati shivaji maharaj sgy 87
Next Stories
1 देखणं, दिमाखदार आणि अभिमान वाटावा असं स्मारक उभारणार -पवार
2 अमित शाह यांचे राऊतांनी केलं कौतुक, “शाह हे प्रखर राष्ट्रभक्त आहेत पण…”
3 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील पुतळ्याची उंची वाढवणार, मंत्रिमंडळाचा निर्णय
Just Now!
X