News Flash

….अन् शरद पवारांनी रस्त्यावर ताफा थांबवून दिला नवदांपत्याला आशीर्वाद

शरद पवारांनी पुन्हा एकदा आपलं मोठेपण दाखवून दिलं

….अन् शरद पवारांनी रस्त्यावर ताफा थांबवून दिला नवदांपत्याला आशीर्वाद

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार किती मोठे नेते आहेत हे त्यांचा जनसामान्यांशी असणारा संपर्क पाहिल्यावर लक्षात येतं. अनेकदा शरद पवार दौऱ्यावर असताना लोक आपुलकीने त्यांची भेट घेण्यासाठी येतात. शरद पवारही भेटायला आलेल्यांना कधी नाराज करत नाहीत. असाच प्रसंग नुकताच सोलापूरमध्ये पहायला मिळाला.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भारत भालके यांच नुकतंच निधन झालं असून त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी शरद पवार पंढरपुरात होते. सरकोली या गावी जाण्यासाठी शरद पवारांचा ताफा निघाला होता. मात्र शरद पवार यांनी इतक्या गडबडीतही ताफा थांबवून भेटायला आलेल्या नवदांपत्याला आशीर्वाद दिला.

झालं असं की, पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील सूरज नवनाथ शिंदे व काजल हरी क्षिरसागर यांचा गुरुवारी विवाहसोहळा पार पडला. यानिमित्ताने दांपत्य ग्रामदैवताच्या दर्शनाला चाललं होतं. याचवेळी शरद पवारांचा ताफा तेथून चालला होता. त्यामुळे दांपत्य शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी थांबले. शरद पवारांनी यावेळी त्यांना नाराज न करता ताफा थांबवला आणि आशीर्वाद दिला. यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.

भारत भालकेंच्या निधनावर शोक व्यक्त
कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर शरद पवारांनी भारत भालकेंच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “आज सरकोली इथे स्व. भारत भालके यांच्या कुटुंबयांची सांत्वनपर भेट घेऊन भारत नानांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या जाण्याने पंढरपूरकरांवर मोठा आघात झाला आहे. गोरगरिबांना कायम रस्त्यावर उतरून मदत करण्याचा त्यांचा स्वभाव आणि जनमानसात रमणारे त्यांचे व्यक्तिमत्व कायम स्मरणात राहील,” असं ट्विट शरद पवारांनी केलं आहे.

पुढे ते म्हणाले आहेत की, ‘भारत नाना माझ्यावर नेहमीच अचल निष्ठा ठेवणारे असे जीवाभावाचे सहकारी होते. आयुष्यात काही राजकीय प्रसंग उद्भवले असतील तरी त्यांचे बारामतीशी नाते कधीही तुटले नाही. पंढरपूरकरांनीही त्यांना नेहमीच साथ दिली, तुमच्या प्रेमाची शक्ती त्यांना स्वर्गातही लाभो”.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2020 10:23 pm

Web Title: ncp sharad pawar blessing to newly wed couple in solapur sgy 87
Next Stories
1 …..म्हणून तर आम्ही १०५ आमदार घरी बसवले-संजय राऊत
2 शेतकरी आंदोलन देशभरात पसरण्यापूर्वी संपणं आवश्यक-सुशील कुमार शिंदे
3 अजित पवारांना जे काही मिळालंय ते शरद पवारांमुळेच, त्यावर स्वत:चं लेबल लावू नये : निलेश राणे
Just Now!
X