राज्यात महाविकास आघाडी सरकार असलं तरी काँग्रेसच्या नेत्यांकडून वारंवार स्वबळाचा नारा देत मनातील खदखद व्यक्त केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार आगामी निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा देत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर…; नाना पटोलेंचं उद्धव ठाकरे, अजित पवारांवर टीकास्त्र

Congress candidate Praniti Shinde criticizes BJP in Solapur
सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी काढली भाजपची लाज
Vishal Patil filed two separate candidatures as Congress and Independent in sangli
सांगलीत विशाल पाटलांचे काँग्रेस व अपक्ष म्हणून दोन स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल
Chandrapur Congress Candidate pratibha dhanorkar Faces Backlash for Accept Lakshmi and Vote Remark
निवडणुकीत ‘लक्ष्मी’ स्वीकारा आणि मतदान करा, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांचे वादग्रस्त वक्तव्य
solapur lok sabha marathi news, vanchit bahujan aghadi solapur marathi news
सोलापुरात भाजप-काँग्रेसच्या लढतीत वंचित, एमआयएमची भूमिका महत्त्वाची

“प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याच्या प्रयत्नात असणार. काँग्रेसने भूमिका घेतली असेल तर त्यात काहीही चुकीचं नाही. आम्ही सरकार एकत्र चालवतो, याचा अर्थ आम्ही पक्ष एकत्रित चालवत नाही. आम्ही प्रत्येकजण पक्ष वेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार. यात काहीही चुकीचं नाही. त्यामुळे यात गैरसमज असण्याचं काहीही नाही. सरकार एक विचारानं आहे की नाही हे महत्वाचं आहे,” असं शरद पवार म्हणाले आहेत.

विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे राहील

शरद पवार यांनी यावेळी विधानसभा अध्यक्षपदावरही भाष्य केलं.” आमच्या तीन पक्षांचा निर्णय झाला आहे. विधानसभेचं अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे कोणीही काही बोलायचा संबंधच येत नाही. आम्हा तिन्ही पक्षांना काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे. त्या निर्णयावर आम्ही कायम आहोत,” असं शरद पवारांनी सांगितलं.

केंद्राच्या सहकार खात्यामुळे महाराष्ट्रात गंडांतर?, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

लोणावळ्यातील मेळाव्यात नाना पटोलेंकडून पुन्हा एकदा स्वबळाचा नारा

“मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितलं. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात…आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,” असा टोला नाना पटोले यांनी लगावला होता.

“ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग आपल्याला ताकद बनवायचा आहे”, असंही नाना पटोले म्हणाले होते.