26 February 2021

News Flash

शरद पवार घेणार सोनिया गांधींची भेट, शिवसेनेला पाठिंबा देण्यावर होणार निर्णय

दिल्लीत ही बैठक पार पडणार आहे

राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सोडवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असून बैठकांच्या माध्यमातून विचारमंथन सुरु आहे. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित सरकार स्थापन करण्यासाठी सकारात्मक असून सामायिक कार्यक्रम ठरवला जात आहे. मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडल्यानंतर आता दिल्लीत बैठक पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यात ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासंबंधी चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

मुंबईत मंगळवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीत शिवसेनाला पाठिंबा देण्यासंबंधी चर्चा झाली होती. या बैठकीला काँग्रेस नेते अहमद पटेल, मल्लिकार्जून खरगे उपस्थित होते. या बैठकीत काय चर्चा झाली यासंबंधी अहमद पटेल सोनिया गांधी यांना रिपोर्ट देणार आहेत. दरम्यान १७ नोव्हेंबरला शरद पवार आणि सोनिय गांधी यांच्यात दिल्लीत बैठक होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.

दरम्यान शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेसाठी समन्वयाची दुसरी बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांच्यात चर्चा झाली. हॉटेलमध्ये पार पडलेल्या या बैठकीत जवळपास सव्वा तास चर्चा झाली. यावेळी काय चर्चा झाली हे मात्र उघड करण्यात आलेलं नाही.

सामायिक कार्यक्रम ठरवण्यासाठी राष्ट्रवादीची समिती, ‘या’ पाच नेत्यांचा समावेश
तिन्ही पक्ष एकत्र येण्याआधी सामायिक कार्यक्रम तयार करणार आहेत. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत राष्ट्रवादीच्या पाच नेत्यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या या समितीत अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 14, 2019 4:04 pm

Web Title: ncp sharad pawar congress sonia gandhi shivsena uddhav thackeray maharashtra politics sgy 87
Next Stories
1 राष्ट्रपती राजवटीवरून अमित शाह यांनी केलेल्या विधानाला कपिल सिब्बल यांनी दिलं उत्तर
2 भाजपा १६ आमदारांना दिलेला शब्द पाळणार
3 सरन्यायाधीशांचे कार्यालय RTIच्या कक्षेत; अद्याप सात न्यायाधीशांनीच केली संपत्ती जाहीर
Just Now!
X