कंगना प्रकरणाशी सरकारचा संबंध नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कंगना प्रकरणाशी सरकारचा काही संबंध नसून कार्यालयावर मुंबई पालिकेने कारवाई केली आहे सांगताना शरद पवारांनी शिवसेनेच्या भूमिकेवर बोलण्यास नकार दिला.

आणखी वाचा- “महाराष्ट्र सरकारला करोनाशी नाही कंगनाशी लढायचं आहे”

“कंगना प्रकरणाचा सरकारशी काही संबंध नाही. कार्यालयावर कारवाई मुंबई पालिकेने केली आहे. पालिकेचे काही नियम असून त्यानुसार ते कारवाई करत असतात. कारवाईचा निर्णय सरकारचा नाही तर पालिकेचा आहे. सर्व जबाबदारी पालिकेची आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- कंगना रणौतच्या आईची शिवसेनेवर टीका, ‘पळपुटे’ उल्लेख करत म्हणाल्या…

मराठा आरक्षण स्थगितीवर बोलताना शरद पवार यांनी फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचं सांगितलं. अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलं. तसंच विरोधकांना राजकारण करायचं आहे, आम्हाला मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको असं आवाहन त्यांनी केलं.