21 September 2020

News Flash

मराठा आरक्षण प्रकरणी विरोधकांना राजकारण करायचं आहे, पण आम्हाला… – शरद पवार

"आम्हाला राजकारण करायचं नाही"

मराठा आरक्षण प्रकरणी आम्हाला राजकारण करायचं नाही असं सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यादेश काढला तर आंदोलन होणार नाही असं मत व्यक्त केलं. मराठा आरक्षण प्रकरणी विरोधकांना राजकारण करायचं आहे अशी टीकाही शरद पवार यांनी केली आहे. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आणखी वाचा- मागचं सरकार असो की विद्यमान… याची जबर किंमत मोजावी लागेल; छत्रपती संभाजीराजे यांचा इशारा

“मला जिथपर्यंत कायदा कळतो त्याप्रमाणे मराठा आरक्षणा संदर्भात अध्यादेश आणू शकतो. फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. आम्हाला मराठा आरक्षण प्रकरणी राजकारण करायचं नाही तर विद्यार्थ्यांना दिलासा द्यायचा आहे. काहींना मराठा समाजात प्रक्षोभ वाढावी असं वाटत असेल,” अशी टीकाही त्यांनी केली. मराठा आरक्षणावरुन केंद्र-राज्य असा वाद नको असं आवाहन करताना मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं.

आणखी वाचा- काँग्रेसच्या काही नेत्यांना मराठा आरक्षण कमीपणाचं वाटतं; चंद्रकांत पाटलांचा आरोप

कंगना प्रकरणाशी सरकारचा संबंध नसल्याचं शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. “कंगना प्रकरणाचा सरकारशी काही संबंध नाही. कार्यालयावर कारवाई मुंबई पालिकेने केली आहे. पालिकेचे काही नियम असून त्यानुसार ते कारवाई करत असतात. कारवाईचा निर्णय सरकारचा नाही तर पालिकेचा आहे. सर्व जबाबदारी पालिकेची आहे,” असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 2:51 pm

Web Title: ncp sharad pawar press conference maratha reservation supreme court sgy 87
Next Stories
1 कंगना प्रकरणाशी सरकारचा संबंध नाही – शरद पवार
2 “महाराष्ट्र सरकारला करोनाशी नाही कंगनाशी लढायचं आहे”
3 राज्यमंत्री विश्वजित कदम कोरोना पॉझिटिव्ह
Just Now!
X