News Flash

महाजनादेश, जनआशीर्वाद यात्रेविरोधात राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा

6 ऑगस्टपासून या यात्रेला सुरूवात होणार आहे.

येत्या काही दिवसांमध्ये राज्याच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यातच अनेक पक्षांच्या बैठका आणि जनसंपर्क वाढवण्यावर सर्वच पक्षांनी भर देण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला सुरूवात होणार आहे. तर शिवसनेतर्फे आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवस्वराज्य यात्रेने उत्तर देण्यात येणार आहे. दरम्यान, खासरदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर या यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली असून खासदार उदनराजे भोसले हेदेखील या यात्रेत सहभागी होणार आहेत.

6 ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 मतदारसंघांमध्ये ही यात्रा काढण्यात येणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून या सभेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्याची सांगत जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच सिंदखेडराजा या ठिकाणी होणार आहे.

शिवस्वराज्य यात्रेचा दुसरा टप्पा 16 ऑग्सटपासून तुळाजापूर येथून होणार आहे. तर या यात्रेची सांगता रायगडावर होणार आहे. या यात्रेची जबाबदारी युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर या यात्रेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 2:02 pm

Web Title: ncp shiv swarajya yatra in maharashtra to counter bjp jan ashirwad yatra shiv sena jan ashirwad yatra jud 87
Next Stories
1 करमाळ्यात इमारतीचा स्लॅब कोसळला, २० ते २५ जण ढिगाऱ्याखाली अडकले
2 सांगली: कृष्णा नदीकाठी पूरसदृश परिस्थिती; जनतेला सतर्कतेचे आवाहन
3 धाक दाखवून भाजपात प्रवेश दिले नाहीत-मुख्यमंत्री
Just Now!
X