News Flash

काँग्रेस-शिवसेनेचा स्वबळाचा नारा टिकणार नाही –  जयंत पाटील

राज्यात अनेक ठिकाणी भाजपामधून राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास अनेक जण इच्छुक आहेत

तुळजापूर येथे संवाद दौऱ्यानिमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षकाऱ्यांशी संवाद साधला. या वेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे आदी उपस्थित होते. (छाया : कालिदास म्हेत्रे)

उस्मानाबाद : सत्तेतील शिवसेना किंवा काँग्रेसने आगामी काळात स्वबळाचा नारा दिल्याची माहिती कानावर पडली आहे. परंतु तसे असेल तर हा त्यांचा नारा टिकणारा नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

तुळजापूर येथून त्यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद सुरू केला असून तुळजाभवानी देवीचे दर्शन घेऊन लोहारा व तुळजापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुस?ऱ्या दौऱ्याची सुरुवात आज झाली आहे. करोनाचे संकट लवकर दूर होवो व लोकांना जगण्यासाठी नवी उमेद मिळो, असे तुळजाभवानीला साकडे घातले असून हा दौरा म्हणजे काही राष्ट्रवादीकडून स्वबळासाठी चाचपणी नाही. सत्तेतील तिन्ही पक्ष एकत्र असून काँग्रेस किंवा अन्य पक्षाचा स्वबळाचा नारा शेवटपर्यंत टिकणार नाही. शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र राहतील व काँग्रेसही आमच्याबरोबर राहील, यासाठी प्रयत्न राहील, असे पाटील म्हणाले.

राज्यात अनेक ठिकाणी भाजपामधून राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास अनेक जण इच्छुक आहेत. सोलापुरातही एमआयएमचा मोठा गट प्रवेश करण्यासाठी तयार आहे. परंतु हे जाहीर प्रवेश असल्याने मोठी गर्दी होणार असल्याने करोनाचा प्रभाव कमी झाल्यावर प्रवेश सोहळा होईल. तत्पूर्वी मराठवाडय़ातील आठ जिल्हे आणि ४६ विधानसभा मतदार संघ सलग ११ दिवस पिंजून काढणार असून ४ जुलै रोजी या संवाद यात्रेचा समारोप होणार आहे. या वेळी सामाजिक न्यायमंत्री धनजंय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, ज्येष्ठ नेते जीवन गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, गोकुळ शिंदे, अमर चोपदार उपस्थित होते. येत्या काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची तयारी करण्याचे आदेशही त्यांनी या वेळी दिले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2021 12:10 am

Web Title: ncp state chief jayant patil remark on shiv sena congrss to go solo in election zws 70
Next Stories
1 पंकजा मुंडेंच्या ओबीसी आंदोलनापाठोपाठ आमदार धस यांचा मराठा मोर्चा
2 वेतनवाढीने कृषी विद्यापीठांचे शिवार फोफावले
3 सांगली जिल्हा परिषदेतील भाजप सदस्यांमध्ये असंतोष
Just Now!
X