मुंबईच्या माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांवरून महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बदलीचा प्रश्नच उद्भवत नाही, असे मत महाराष्ट्राचे मंत्री आणि राज्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.

वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना पाटील म्हणाले, “मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर परम बीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं पत्र ही त्यांची प्रतिक्रिया आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या बदलीचा प्रश्नच उद्भवत नाही.”

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना महाराष्ट्रातील होमगार्ड विभागात बदली करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाबद्दल पाटील बोलत होते. काही दिवसांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराच्या बाहेर बॉम्ब असलेली गाडी आणि सोबत एक धमकीपत्रसुध्दा सापडले होते. याप्रकरणी सचिन वाझे यांना राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एनआयए) अटक केल्यानंतर काही दिवसांनी हा मोठा बदल झाला.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या चुकांमुळे सिंग यांची बदली करण्यात आली होती. तीनच दिवसांनंतर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी महाराष्ट्रातील गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचार, खंडणी आणि पोलिस तपासात हस्तक्षेप केल्याचा ठपका ठेवत एक पत्र मुख्यमंत्र्याना पाठवले होते.

अनिल देशमुख यांनी हे आरोप खोडून काढले आहेत आणि म्हटले आहे की, सिंग हे स्वत: ला गंभीर कायदेशीर कारवाईपासून वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत.