सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यादरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाची तोडफोड केली असून कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या हाणामारीमागचे नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे भाषण सुरू असतानाच कार्यक्रम स्थळाच्या बाहेर कार्यकर्ते आपासात भिडले. घटनेची माहिती मिळताच जयंत पाटील यांनी कार्यक्रम स्थळावरून काढता पाय घेतला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2016 8:05 pm