23 January 2021

News Flash

“ठाकरे सरकार पडलं तर…,” सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

"मोकळी भांडी फार वाजतात"

जे लोक सारखं सरकार पडणार म्हणतात ते ऐकताना मला गंमत वाटते. जी भांडी मोकळी असतात ती खूप आवाज करतात. भरलेलं भांडं कधी आवाज करत नाही असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना लगावला आहे. “करायचा तेवढा आवाज करा, पडलं तर बघू काय करायचं. आयुष्यभर सत्तेत राहण्यासाठी कोणी आलेलं नाही. आज आम्ही आहोत कधीतरी त्यांची येईल. पण ती लवकर येणार नाही,” असंही त्या म्हणाल्या आहेत. इंदापूरात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा प्रचार करताना त्या बोलत होत्या.

“लोकं सारखं म्हणतात की हे सरकार पडणार. हे ऐकताना मला गमंत वाटते. मोकळी भांडी फार वाजतात. त्यामुळे भांड्यांनी करायचा तितका आवाज करा. सरकार पडलं तर बघू काय करायच ते…हे सरकार स्थिर आणि टिकणारे सरकार आहे,” असं सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- महाविकास आघाडी सरकार जनमताविरुद्ध असतं तर…; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर शरसंधान

सुप्रिया सुळे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्यावरही भाष्य केलं. नरेंद्र मोदी शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट देण्यासाठी येणार आहेत. यावेळी ते लसीच्या प्रगतीसंबंधी आढावा घेणार आहेत. “आपल्या सरकारला एक वर्ष होणार आणि देशाचे प्रधानमंत्री आपल्या जिल्ह्यातल्या ठिकाणी काम होत आहे हे पाहण्यासाठी येणार याच्यापेक्षा काय मोठे यश आपल्या सरकारचे असेल?,” असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. “देशाचे प्रधानमंत्री वेगळ्या विचाराचे असले तरी त्यांना आपलं पुणे हवंहवंसं वाटतंय,” असा टोला त्यांनी लगावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 27, 2020 1:59 pm

Web Title: ncp supriya sule on maharashtra government opposition sgy 87
Next Stories
1 “सर्वोच्च आणि उच्च न्यायालयालासुद्धा ‘महाराष्ट्रद्रोही‘ ठरविणार का?,” फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल
2 “माझ्या आजीला असं वाटायचं की…”; उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा संदर्भ देत सांगितली ‘ती’ आठवण
3 “जनतेने बहुमत दिलेलं नसतानाही…,” पंकजा मुंडेंची ठाकरे सरकारवर टीका
Just Now!
X