06 December 2019

News Flash

मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर बेरोजगारीचा बकासूर माजणार-राष्ट्रवादी

ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर राष्ट्रवादीने निशाणा साधला आहे

भाजपा समर्थकांनी नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी #ComeAgainModiji हा ट्विटर ट्रेंड सुरु केला आहे. याच ट्विटर ट्रेंडवर राष्ट्रवादीने ट्विटरच्या माध्यमातूनच निशाणा साधला आहे. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर बेरोजगारीचा बकासूर माजेल असं राष्ट्रवादीनं म्हटलं आहे. यासाठी राष्ट्रवादीने एका व्यंगचित्राची मदत घेतली आहे. या व्यंगचित्रात एक भलामोठा राक्षस दाखवण्यात आला आहे. हा राक्षस जनतेला तुडवतो आहे असं दाखवण्यात आलं आहे.

मोदी पंतप्रधान झाले तर महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या या समस्या वाढतील असेही या ट्विटमध्ये म्हटलं आहे. बेरोजगारीचा बकासूर तरूणाईला तुडवतोय असे दाखवण्यात आले आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी ज्याप्रमाणे सोशल मीडियाचा प्रभावी वापर भाजपाकडून करण्यात आला होता. आता तसाच वापर राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येतो आहे. तसंच काँग्रेसकडूनही करण्यात येतो आहे. लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत या निवडणुकांमध्ये भाजपा विरूद्ध काँग्रेस अशीच लढाई आहे. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपाला लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.

 

 

 

First Published on February 11, 2019 4:15 pm

Web Title: ncp tweets a cartoon on twitter against narendra modi
Just Now!
X