News Flash

पवारांच्या भेटीसाठी ‘गोविंदबाग’ फुलली

हा सोहोळा कौटुंबिक असतो. यावेळी त्याला राजकीय स्वरुप आले होते.

बारामती : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी एकहाती किल्ला लढवणारे व पक्षाला अपेक्षित यश मिळवून देणारे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य कार्यकर्ते आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बारामतीतील त्यांचे निवासस्थान गोविंदबागेत मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. परळीतून पंकजा मुंडेचा पराभव करणारे धनंजय मुंडे, ठाण्यातून भरघोस मतांनी विजयी झालेले जितेंद्र आव्हाड यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक नव्या आमदारांनी आज बारामतीत जाऊन पवारांचे आशीर्वाद घेतले. ऐरवी दर दिवाळीला गोविंदबागेत पवार कुटुंबातील सर्व एकत्र येतात. हा सोहोळा कौटुंबिक असतो. यावेळी त्याला राजकीय स्वरुप आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2019 4:01 am

Web Title: ncp workers greet sharad pawar in baramati on diwali zws 70
Next Stories
1 पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
2 World Stroke Day 2019 : ‘मेंदू घाता’च्या ३० टक्के रुग्णांना कायमचे अपंगत्व!
3 “आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका”; खुद्द शिवसैनिकांनीच केली उद्धव ठाकरेंना विनंती
Just Now!
X