News Flash

गोपीचंद पडळकर यांचं तोंड काळं करुन चोप देणार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा इशारा

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा गोपीचंद पडळकर यांना इशारा

संग्रहित

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचं तोंड काळं करुन चोप देणार असा अशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी दिला आहे. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे असं वादग्रस्त वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केल्याचा आरोपही गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना नितीन देशमुख यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना हा इशारा दिला.

आणखी वाचा- “गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल”, जितेंद्र आव्हाड यांचा गोपीचंद पडळकरांना इशारा

‘गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांबद्दल अनुद्गार काढले आहेत. वाचाळ वक्तव्य करणं भाजपाची परंपराच होत चालली आहे. सर्वसामान्यांना दुखावणाऱ्या वक्तव्यावरुन ते माघार घेतील असं आम्हाला वाटत नाही. मुंबईत जिथे कुठे गोपीचंद पडळकर दिसतील तिथे तोंड काळं करुन चोप देण्यात येणार,” असं नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा- सूर्यावर थुंकू नका, डिपॉझिट अन अस्तित्व टिकून राहिल हे बघा; धनंजय मुंडेंनी पडळकरांना सुनावलं

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीदेखील गोपीचंद पडळकर यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा दिला आहे. शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

“शरद पवारांच्या पायाच्या धुळीची लायकी नसलेल्या माणसाने त्यांच्यावर टीका करावी हे हसण्यासारखं आहे. केवळ प्रसिद्धीच्या वर्तुळात राहण्याचा हा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची. जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवताय. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला शरद पवारांनी इथपर्यंत आणलं आहे,” असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2020 4:17 pm

Web Title: ncp youth congress on bjp gopichand padalkar statement on sharad pawar sgy 87
Next Stories
1 सूर्यावर थुंकू नका, डिपॉझिट अन अस्तित्व टिकून राहिल हे बघा; धनंजय मुंडेंनी पडळकरांना सुनावलं
2 औरंगाबाद जिल्ह्यात आज आढळले 125 नवे करोना पॉझिटिव्ह
3 मीटर रिडींगद्वारे वीजबिल देण्यास सुरूवात; घरगुती वीजग्राहकांना हप्त्याने भरता येणार बिल
Just Now!
X