महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या स्वागतासाठी तसेच त्यांच्या विरोधात निदर्शनासाठी जमलेल्या जमावांमध्ये दगडफेक होऊन नगरजवळील भिंगार येथे प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलिसांनी परस्परांना भिडणाऱ्या मनसे व तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार करून परिस्थिती ताब्यात आणण्याचा प्रयत्न केला. ठाकरे यांच्या नगरमधील आगमनप्रसंगी मंगळवारी रात्री हा प्रकार घडला. दगडफेकीत दोन्ही बाजूचे काही कार्यकर्ते जखमी झाले.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणांतून सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे त्यांचे नगरमधील आगमन लक्षात घेऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे व कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून त्यांना निषेध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला. दुपारी तीनपासूनच काळे तसेच त्यांचे सहकारी भिंगार बँकेच्या मुख्य कार्यालयाजवळ जमा झाले होते. त्यांना सायंकाळी माजी महापौर, नगरचे शहर जिल्हाध्यक्ष संग्राम जगताप व त्यांचे कार्यकर्ते येऊन मिळाले.  ठाकरे यांना येण्यास विलंब लागू लागला तशी जमावाची मानसिकता बदलत गेली. अखेरीस रात्री ९ वाजता त्याचा स्फोट झाला. रात्री ९ वाजता ठाकरे नगरमध्ये येत असल्याची माहिती समजली. त्यावेळी दोन्ही जमाव एकमेकांसमोर आले.

पुन्हा दगडफेक, लाठीमार
या प्रकारामुळे राज ठाकरे यांना नगर शहरापासून दहा-बारा किलोमीटर अंतरावर मेहेकरी गावातच थांबविण्यात आले.  त्यांच्या ताफ्यात तीस ते चाळीस मोटारी होत्या. भिंगारमध्ये त्यांचे जंगी स्वागत करून फटाके उडविण्यात आले. मनसे व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा जोरदार घोषणायुद्ध झाले. या वेळी  ठाकरे यांच्या मोटारीच्या ताफ्यावरही दगडफेकीचा प्रकार घडला. पोलिसांनी जमावावर पुन्हा लाठीमार केला. या प्रकारानंतर राज ठाकरे यांचे मुक्कामाचे ठिकाण बदलण्यात आले  आहे.

25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’
hemant patil
भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल; हिंगोली, यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की
sharad pawar arvind kejriwal
“केजरीवालांची अटक भाजपासाठी बुमरँग ठरेल”, २०१५, २०२० च्या निवडणुकींचा दाखला देत शरद पवारांचं वक्तव्य
Beed Lok Sabha
बीडमध्ये मराठा ध्रुवीकरणाचा शरद पवारांचा प्रयोग