18 September 2020

News Flash

राष्ट्रवादीला धक्का, परभणीतील १३ नगरसेवकांचे राजीनामे

परभणी महानगरपालिकाध्ये राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला परभणी महानगरपालिकामध्ये मोठा धक्का बसला आहे. परभणी महानगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या १३ नगरसेवकांनी राजीनामे पक्षाकडे पाठवले आहे. ग्रामीण परभणीचे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून सर्वांनी राजीनामे पाठवले आहेत.

परभणी महानगरपालिकाध्ये राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक आहेत. त्यापैकी १३ नगरसेवकांनी आपले राजीनामे शहर जिल्हाध्यक्ष स्वराज परिहार यांच्याकडे आपले राजीनामे दिले आहेत.

परभणी महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य विष्णू नवले यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला हे पद देण्याचा ठराव राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी घेतला होता. मात्र बाबाजानी दुर्राणी यांनी ऐन वेळेला पक्षाशी संबंध नसलेल्या अतिक इनामदार यांचा अर्ज दाखल केल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक चांगलेच संतापले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 5:14 pm

Web Title: ncps 13 corporators resign in parbhani municipal corporation
Next Stories
1 पुणे पोलिसांना हादरा; आनंद तेलतुंबडेची अटक बेकायदेशीर, न्यायालयाची चपराक
2 माझं बरं वाईट झाल्यास जनता मोदींना जबाबदार ठरवेल – हजारे
3 पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून नक्षलींनी केली दोन ग्रामस्थांची हत्या
Just Now!
X