News Flash

राज्यात महाआघाडीच्या तुलनेत भाजपा २० टक्के देखील नाही – जयंत पाटील

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आले असल्याचाही दावा केला आहे.

संग्रहीत

“काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना तिन्ही पक्षांनी मिळून वेगवेगळ्या ठिकाणी निवडणुका लढवलेल्या आहेत. सर्वात समाधानाची बाब ही आहे, या सर्व गडबडीत भाजपाचं अस्तित्व फार मर्यादित राहिलं आहे. राज्यात महाआघाडीसमोर भाजपा २० टक्के देखील नाही”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज माध्यामांसमोर बोलून दाखवलं आहे. तसेच, ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पक्ष सर्वात जास्त जागांवर विजयी झाला असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

जयंत पाटील म्हणाले, “माझ्याकडे राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील निकालाची माहिती आहे. १३ हजार २९५ जागांच्या निवडणुका झाल्या आहेत. ३ हजार २७६ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला आहे. काँग्रेसला १ हजार ९३८ जागांवर यश मिळालं आहे. भाजपा २ हजार ९४२ जागांवर विजयी झाली आहे व शिवसेना २ हजार ४०६ जागांवर विजयी झालेली आहे, अशा माझ्याकडे आलेली माहिती आहे. त्यामुळे आकडे बोलके आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस हा तळागाळातील पक्ष आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आलेले आहेत.”

तसेच, “वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळे पक्ष पुढे आहेत परंतु, राज्यात महाआघाडीसमोर भाजपा २० टक्के देखील नाही, असं चित्र सध्या आहे.” असं देखील यावेळी जयंत पाटील यांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 19, 2021 5:37 pm

Web Title: ncps highest number of candidates elected in gram panchayat elections jayant patil msr 87
Next Stories
1 “शिवसेनेने औरंगजेबाची जयंतीही साजरी करावी”
2 ‘हा’ विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहिल -उद्धव ठाकरे
3 ‘तो’ आपल्या गळ्यातील ताईत कायम आहे का? हे भाजपच्या ‘त्या’ नेत्यांनी सांगावं; रोहित पवारांचा सवाल
Just Now!
X