News Flash

भयमुक्त भारतासाठी भाजपला सत्तेपासून रोखा-सचिन पायलट

सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने देशवासीयांशी दगाबाजी केली आहे.

नवा मोंढा मदानावर सभेत बोलताना खासदार सचिन पायलट.

 नांदेड : खोटी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपने दलित, अल्पसंख्याक, महिला, व्यापारी व पत्रकार यांच्यावर अन्याय करण्याची मालिका सुरू केली आहे. या शासनाच्या काळात वेगवेगळ्या घटकांवर दबाव टाकला जात आहे. देशामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, नि:पक्षपातीपणे काम करणाऱ्या न्यायव्यवस्थेमध्येसुद्धा ढवळाढवळ शासनाने सुरू केली आहे. त्यामुळे देशात भीतीचे व दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे भयमुक्त भारत निर्मितीसाठी भाजपला सत्तेपासून रोखा, असे आवाहन राजस्थान प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी येथे केले. सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने देशवासीयांशी दगाबाजी केली आहे. मूळ विषयाला बगल देऊन ताजमहल, पद्मावती, गोमांस, राम मंदिर असे विषय समाजापुढे मांडले जात आहेत. ज्यामुळे समाजात तेढ निर्माण होईल व याचा लाभ भाजपला होईल, याची काळजी शासनाकडून घेतली जाते. नोटबंदी करून नरेंद्र मोदी यांनी देशाला २० वर्षे पाठीमागे नेले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. दलित आणि महिला यांवरील होणारे अत्याचार ही शरमेची बाब झाली आहे. मुलींवरील अत्याचारांमध्ये भाजपच्या आमदाराचा सहभाग आहे. यावरून हे सरकार गुंड प्रवृत्तींना प्रोत्साहन देते हे दिसते. देशामध्ये दहशत निर्माण करून सत्ता पुन्हा एकदा हस्तगत करण्याचा इरादा भाजपचा जरी असला, तरी आगामी सर्व निवडणुकांमध्ये जनता त्यांना निश्चित जागा दाखवेल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. या सभेत खासदार अशोक चव्हाण, मोहन प्रकाश, खासदार राजीव सातव, आमदार नसीम खान, डी.पी.सावंत, इमरान प्रतापगढी आदींची या वेळी भाषणे झाली. नांदेड शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने येथील नवा मोंढा मदानावर एका जाहीर सभेचे आयोजन केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 4:27 am

Web Title: need to keep bjp stay away from power for fear free india says sachin pilot
Next Stories
1 मुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी
2 बिबटय़ाच्या हल्ल्यात पोलीस पाटील जखमी ; बिबटय़ाचा मृत्यू
3 नाणारच्या तव्यावर विरोधकांची पोळी
Just Now!
X