01 March 2021

News Flash

नाशिकमधील अशांतता महाजनांमुळे वाढली, नीलम गोऱ्हेंचा खळबळजनक आरोप

नाशिकमधील अशांतता वाढवणारे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे, नीलम गोऱ्हेंचा घणाघात

नीलम गोऱ्हेंचा गिरीश महाजनांवर खळबळजनक आरोप

सत्तेच्या आधारामुळे नाशिकमध्ये अशांतता वाढल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याकडून करण्यात आला आहे. नीलम गोऱ्हे यांनी खळबळजनक आरोप करताना थेट नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. नाशिकमध्ये रविवारी पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नाशिकमधील अशांतता वाढल्याचा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला आहे. अशांतता पसरवणारे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

तळेगाव’च्या निमित्ताने राजकीय हिशेब चुकते करण्यावर भर
नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमधील तळेगावात रविवारी पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली. यानंतर रात्रीच हजारोंचा जमाव त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यासमोर जमा झाला होता. समाज माध्यमांवरुन या घटनेनंतर अफवादेखील पसरवण्यात आल्या होत्या. रविवारी संतप्त जमावाने ठिकठिकाणी गाड्यांची मोडतोड आणि जाळपोळ केली. यावेळी पीडित बालिकेवर बलात्कार झाला नसल्याचे विधान गिरीश महाजन यांनी केले होते. वैद्यकीय अहवालाचा संदर्भ देत महाजन यांनी हे विधान केले होते. गिरीश महाजन यांनी यानंतर त्यांच्या या विधानाबद्दल माफीदेखील मागितली होती. महाजन यांच्या याच वक्तव्यावर नीलम गोऱ्हेंनी टीका केली आहे.

पाच वर्षाच्या चिमूरडीवर लैंगिक अत्याचार

तळेगावात बालिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचे पडसाद नाशिकमध्ये उमटले होते. यावेळी पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य करण्यात आले. संतप्त जमावाकडून झालेला हिंसाचार पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या विधानामुळेच झाल्याचा खळबळजनक आरोप गोऱ्हे यांनी केला आहे. ‘सत्तेच्या आधारामुळेच नाशिकमधील अशांतता वाढली. महाजन यांच्या वक्तव्यामुळेच नाशिकमध्ये अशांतता पसरली. अशांतता पसरवणारे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत’, असा घणाघाती आरोप गोऱ्हे यांनी केला आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपमधील संघर्ष लैंगिक अत्याचारासारख्या संवेदनशील मुद्यावरुनही दिसून आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2016 4:25 pm

Web Title: neelam gorhe says girish mahajan responsible for tense situation in nashik
Next Stories
1 प्रवरानगरमध्ये ग्रंथपालाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग, पालकांचे आंदोलन
2 सोलापूर – पुणे महामार्गावर अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
3 सुरेश जैन हे राजकारणाचे बळी- उद्धव ठाकरे
Just Now!
X