News Flash

एवढा मोठा पुरस्कार मिळेल असे वाटले नव्हते – बाबासाहेब पुरंदरे

'पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्याने मी भारावून गेलो आहे'

ब्रिटीश राजवटीच्या काळात माझा जन्म झाला असून आज माझे वय 97 आहे. या वयामध्ये देशाच्या राष्ट्रपतींकडून पद्मविभूषण पुरस्कार दिला जाणार आहे. त्यामुळे मी भारावून गेलो आहे. एवढा मोठा पुरस्कार मिळेल असं मला कधी वाटलं नव्हतं अशी भावना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर व्यक्त केली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. दिल्लीत शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा करण्यात आली. कला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी बाबासाहेब पुरंदरे यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घरोघरी पोहोचविण्याचे काम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी केले आहे. यापूर्वी महाराष्ट्र शासनाने त्यांना महाराष्ट्रभूषण पुरस्काराने गौरविले आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणाले की, काल रात्रीच्या सुमारास पद्मविभूषण पुरस्कारसाठी नाव जाहीर झाल्याने मी चकित झालो. तर आजच्या पुरस्कारावेळी आई आणि वडिलांची आठवण येते आहे. तसेच मला ज्या शिक्षकांनी शिकवले त्यांचेदेखील आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये खूप मोठे योगदान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पुरस्कार जाहीर झाल्यावर अनेकांचे फोन आले. त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी पुरस्कार जाहीर झाल्यानंतर लगेच फोन करुन शुभेच्छा दिल्या आणि उद्या अमितचे लग्न आहे अशी आठवण करून दिल्यावर तर मी नक्की येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 4:51 pm

Web Title: never thought will get padma bhushan award says babasaheb purandare
Next Stories
1 दुर्दैव ! ध्वजारोहणासाठी जात असताना अपघात होऊन दोन एनसीसी कॅडेट्सचा मृत्यू
2 साईभक्तांसाठी खुशखबर: IRCTC च्या वेबसाईटवर दर्शनासाठी तिकीट बुक करता येणार
3 प्रजासत्ताक दिनानिमित्त तिंरग्यात सजला विठुराया
Just Now!
X