लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलढाणा जिल्ह्यात एकूण करोना बाधित रुग्ण संख्येन रविवारी दोनशेचा टप्पा ओलांडला आहे. सलग दुसºया दिवशी आणखी १५ करोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या २१३ झाली. दरम्यान, आज पाच जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

बुलढाणा जिल्ह्यातील ३१ नमुन्यांचे अहवाल आज प्राप्त झाले. त्यातील १६ नकारात्मक, तर १५ अहवाल सकारात्मक आले आहेत. सकारात्मक आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मलकापूर येथील ४० वर्षीय महिला, जोगडी फैल येथील ३० वर्षीय महिला, वरवट बकाल येथील ५१ वर्षीय पुरुष, शेगाव तालुक्यातील आळसणा येथील ४५, ७२ वर्षीय महिला, १६ वर्षीय मुलगी, १८ वर्षीय तरुण, ३३ वर्षीय पुरुष व ११ वर्षीय मुलगा, जळगाव जामोद येथील ५३, ५६ व ६७ वर्षीय पुरुष, शेगाव काँग्रेस नगर येथील १९ वर्षीय तरुणी, संग्रामपूर तालुक्यातील निवाना येथील ३४ व ३६ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २१३ करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून, त्यापैकी १४४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. सध्या ५८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील आणखी १२६ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण २४३४ अहवाल नकारात्मक आले आहेत. दरम्यान, आज पाच रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामध्ये शेगाव जोगडी फैल येथील ५८ वर्षीय महिला, नांदुरा येथील ४५ वर्षीय पुरुष, मलकापूर पारपेट येथील २९ वर्षीय पुरुष, संग्रामपुर तालुक्यातील पातुर्डा येथील ६६ वर्षीय पुरुष व ३७ वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.