करोना लॉकडाउन काळात बंद करण्यात आलेले विविध उद्योगधंदे अनलॉक प्रक्रियेत हळूहळू सुरू होत आहे. मात्र, अद्यापही विविध व्यवसयांवर निर्बंध आहेत. तर, आतापर्यंत अनेक व्यवसाय सुरू करण्यास राज्य सरकारकडून परवानगी दिली जात नव्हती. या पार्श्वभूमीवर मागील काही दिवस अगोदर संबंधित व्यावसायिक संघटनांच्या प्रतिनिनधींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवसास्थानी कृष्णकुंज येथे जाऊन, भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले होते. यावर राज ठाकरे यांनी पुढाकर घेत, अनेकांच्या अडचणी सोडवण्यात महत्वाची भूमिका बजावल्याचे दिसून आले.

या पार्श्वभूमीवर मनेसे नेत संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. ”समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता राज ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28” असं संदीप देशपांडे यांनी ट्विट केलं आहे.

आतापर्यंत राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे जाऊन, जिम चालक, पुजारी, केबलचालक, बेस्टचे कंत्राटी कर्मचारी, कोळीबांधव, बॅण्डवाले, वारकरी, मूर्तीकार, डबेवाले, वीजबिल ग्राहक व डॉक्टरांच्या शिष्टमंडळ आदी संघटनांच्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांसाठी भेट घेतली आहे.