News Flash

आशुतोष सलील पर्यटन विकास महामंडळाचे नवे व्यवस्थापकीय संचालक

महाराष्ट्रातील पर्यटनाला प्रोत्साहन देऊन, पर्यटकांना चांगल्या सुविधा देण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदावर आशुतोष सलील याची नियुक्ती झाली असून त्यांनी आज आपल्या पदाची मुंबई येथे सूत्रे स्वीकारली आहे. ते यापूर्वी मुंबई महानगर पालिकेचे अपर आयुक्त होते.
महाराष्ट्रातील पर्यटनाला प्रोत्साहन देऊन देशातील तसेच विदेशातील पर्यटक यांना पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य देणार असल्याचे यावेळी सलील यांनी सागितले.

विदर्भातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ पुढाकार घेऊन चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सागितले. आशुतोष सलील हे यापूर्वी वर्धा व चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते. अमरावती येथून सलील यांनी आपल्या प्रशासकीय सेवेला सुरुवात केली.

अमेरिकेतील विद्यापीठाची त्यांना फेलोशिप मिळाली आहे. नॅशनल लॉ स्कूल बंगलोर येथून विशेष प्राविण्यासह पदवी मिळवली व त्यानंतर काही वर्षे दिल्ली हायकोर्टमध्ये प्रॅक्टिसही केली आहे.  वर्धा व चंद्रपूर येथे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून योजनाचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांचा शासनाने उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरव केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 9:19 pm

Web Title: new managing director of ashutosh salil tourism development corporation msr 87
Next Stories
1 महाराष्ट्रात ७ हजार १८८ करोना रुग्ण बरे होऊन घरी, आत्तापर्यंत १ लाख ८२ हजार रुग्णांना डिस्चार्ज
2 सोलापूर : पत्नी करोनाबाधित आढळताच वृध्द पतीची आत्महत्या
3 सोलापूर ग्रामीणमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ
Just Now!
X