23 February 2019

News Flash

आनंद निर्माण करण्यासाठी नवीन मंत्रालय

‘ग्रॉस नॅशनल हॅपिनेस’ ही संकल्पना मांडली.

आनंदी माणसांच्या निकषात भारत ११३ व्या क्रमांकावर असून ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि राज्यातील जनतेला सुखी, आनंदी, सुरक्षित करण्याबरोबरच त्यांच्यात सकारात्मक वाढीस लागण्यासाठी आनंद मंत्रालय (हॅपिनेस मिनिस्ट्री) आणण्याचा विचार सरकार करीत आहे. या मंत्रालयाचा आराखडा तयार झाला असून लवकरच त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

विधानमंडळाच्या राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने राज्यातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा अभ्यास करणाऱ्य़ा पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या संसदीय अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात  ‘महाराष्ट्र गतिशील पायाभूत विकासात सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे योगदान’ या विषयावर बोलताना पाटील यांनी ही माहिती दिली.

भूतानची संकल्पना

  • १९७९ मध्ये भूतानच्या राजाने देशाच्या विकासाचा पर्यायी निर्देशक म्हणून ‘ग्रॉस नॅशनल हॅपिनेस’ ही संकल्पना मांडली. २००८ मध्ये भूतानच्या राज्यघटनेत या संकल्पनेचा समावेश.
  • भूतानच्या पावलावर पाऊल ठेवत व्हेनेझुएला, संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांत आनंद मंत्रालयांची स्थापना.
  • भारतात ऑगस्ट २०१६ मध्ये सर्वप्रथम मध्य प्रदेशात आनंद मंत्रालयाची स्थापना.
  • एप्रिल २०१८ मध्ये आंध्र प्रदेशात आनंद निर्देशांकानुसार विकासाचे मापन सुरू.

First Published on July 12, 2018 1:48 am

Web Title: new ministry to create happiness