News Flash

‘महिला बचत गटांसाठी नवीन योजना आणणार’

सिंधू सरसच्या माध्यमातून महिला बचत गटांना एक जिल्हा पातळीवर एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम आहे.

| February 14, 2015 03:30 am

सिंधू सरसच्या माध्यमातून महिला बचत गटांना एक जिल्हा पातळीवर एक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा स्तुत्य उपक्रम आहे. महिला बचत गटांना अजून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याकरिता नव्याने येणाऱ्या अंदाजपत्रकात विशेष तरतूद करणार असल्याची ग्वाही वित्त व ग्रामविकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

कुडाळ येथे सिंधू सरस विक्री व प्रदर्शन २०१५ च्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री दीपक केसरकर बोलत होते. या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हाधिकारी ई.रवींद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा, परिषद सिंधुदुर्ग, दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, पंचायत समिती सभापती प्रतिभा घावनळकर, उपसभापती रामचंद्र सावंत, कुडाळ सरपंच स्नेहल पडते, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक किशोर जाधव, प्रकल्पाचे संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे सुनील रेडकर, गटविकास अधिकारी कुडाळ व्ही. एम. नाईक यांसह अधिकारी व महिला बचत गटाचे स्टॉल विक्रेते या वेळी उपस्थित होते.
दीपक केसरकर म्हणाले, महिला बचत गटांनी पारंपरिक व्यवसायाबरोबर आधुनिक व्यवसायाची कास धरून रोजगारातून अर्थार्जन करावे. सिंधू सरसच्या माध्यमातून महिला बचत गटांना दरवर्षी जिल्हा पातळीवर बाजारपेठ मिळते. याचा लाभ महिला बचत गटांनी घ्यावा. बचत गटांची उन्नती साधावी. याकरिता राबविण्याात येणाऱ्या सिंधू सरस या उपक्रमासाठी सध्या दहा लाख रुपये निधी मिळतो तो अपुरा आहे. तो वाढवून पुढच्या वर्षी पंधरा लाखांपर्यंत देण्यात येईल. यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. बचत गटांना पर्यटनावर आधारित रोजगार वाढीसाठी आपण योजना आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मतही दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांनी प्रास्ताविक केले. बचत गटांसाठी जिल्हा पातळीवर एक बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते. या उपक्रमातून महिलांचे मनोधर्य वाढविण्याचा प्रयत्न आहे. बचत गटांच्या माध्यमातून महिलांना मिळत असलेले स्वावलंबनाचे धडे हे प्रगतीचीच वाटचाल आहे. सिंधू सरस हा उपक्रम महिला बचत गटांना एकत्र आणतो. ही चळवळ
महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी पूरक आहे.
सूत्रसंचालक कृषी अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली. तसेच मृणाल सावंतने श्रीगणेश वंदना कार्यक्रमाचे सादरीकरण केले. या वेळी कार्यक्रमात बचत गटांसोबत शासकीय विभागांचेही स्टॉल लावण्यात आले आहेत. या वेळी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2015 3:30 am

Web Title: new policy for women self help group
Next Stories
1 लाचखोर अधिकाऱ्यांकडून १८ कोटींची मालमत्ता जप्त
2 विखे-कर्डिलेंचे सहमतीचे सूतोवाच
3 शरद पवारांकडून खूप काही शिकण्यासारखं – मोदी
Just Now!
X