30 September 2020

News Flash

जाणून घ्या नव्या राजधानी एक्स्प्रेसबद्दल तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं

मध्य रेल्वे मार्गावर तब्बल 27 वर्षांनी सुरू झाली दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेस. ठाणे, नाशिक, जळगावकरांना दिलासा.

मध्य रेल्वे मार्गावर तब्बल २७ वर्षांनी सुरू झालेल्या दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेसमुळे मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, बदलापूर, कर्जत, कसारा, पनवेल मार्गावरील प्रवाशांची पश्चिम रेल्वेपर्यंतची पायपीट थांबणार आहे. याशिवाय ठाणे, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यातून ही राजधानी मार्गस्थ होत असल्याने येथील प्रवाशांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. काल (दि. १९) फुले, हार, फुगे यांनी सजलेल्या मुंबई-निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेसला केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि मध्य रेल्वेवरुन तब्बल २७ वर्षांनंतर पहिली राजधानी एक्स्प्रेस दिल्लीकडे रवाना झाली. दरम्यान या एक्स्प्रेसबाबत प्रवाशांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. जाणून घेऊया अशाच काही प्रश्नांची उत्तरं –

कधी धावणार आणि वेळ काय –
राजधानी एक्स्प्रेस आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. दर बुधवारी व शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. ती दुसºया दिवशी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी दिल्लीत पोहोचणार आहे. दिल्लीहून ही गाडी दरगुरुवारी आणि रविवारी दुपारी ३.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. या गाडीने कल्याणहून दिल्लीला १८ तास ४२ मिनिटांत पोहोचता येईल. फेऱ्या वाढवण्याचा विचार केला जात आहे.

अंतर किती –
१ हजार ५४३ किमीचा प्रवास
पश्चिम रेल्वेवरून मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस सुरू होती. मध्य रेल्वेच्या प्रवाशांना यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल किंवा वांद्रे टर्मिनस गाठावे लागत होते. मात्र, आता मध्य रेल्वेवर राजधानी एक्स्प्रेस सुरू झाल्याने, मुंबईकरांना दिल्ली गाठणे सोपे झाले आहे. पश्चिम रेल्वेवरून मुंबई-दिल्ली प्रवास १ हजार ३४५ किमीचा आहे, तर मध्य रेल्वेवरून १ हजार ५४३ किमीचा आहे. मुंबई, कल्याण, नाशिक, जळगाव येथील आणि यांच्या ठिकाणाच्या जवळील प्रवाशांना प्रवास करणे सोईस्कर होईल.

थांबे कोणते –
या गाडीला कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी, आग्रा कॅन्टोन्मेंट येथे थांबे आहेत.

वेग किती –
गाझियाबाद येथून मागवण्यात आलेल्या wap5 या इंजिनसह ही राजधानी धावणार आहे. ताशी १०० ते १२० किमी या वेगाने एक्स्प्रेसची चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे सुमारे ताशी ८० ते ९० किमी या वेगाने एक्स्प्रेस धावण्याचे नियोजन आहे. भुसावळ जंक्शनला न थांबणारी ही पहिली एक्स्प्रेस असणार आहे. राजधानी गाडीचा वेग कर्जत, कसारा घाटमाथ्यातून जातानाही कायम किंवा त्यापेक्षा जास्त राहावा यासाठी दोन्ही बाजूला इंजिन जोडण्यात येणार आहे. यामुळे थोडाफार वेग वाढेल.

आठ एक्स्प्रेसच्या वेळेत बदल –
राजधानी एक्सप्रेसमुळे सुमारे आठ एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. यात प्रीमियम दर्जाची सिकंदराबाद-हजरत निजामुद्दीन राजधानी, मद्रास-निजामुद्दीन गरीबरथ, सीएसएमटी जनसाधरण, एलटीटी-लखनऊ एसी सुपरफास्ट यांचा समावेश आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणार्या सिंहगड, सह्याद्री, सेवाग्राम, गोदावरी, पुणे-भुसावळ या एक्स्प्रेसचा सीएसएमटी मुंबई राजधानिमुळे वेळापत्रकात बदल होणार आहे.

तिकीट दर –
फ्लेक्सी फेअरमुळे तिकीट वाढण्याची शक्यता असल्याने तिकीट आरक्षण करताना दरांची खात्री करून घ्यावी.
मुंबई सेंट्रल टर्मिनस येथून प्रथम श्रेणीतील तिकीट दर ४,७३० रुपये, द्वितीय श्रेणीचा दर २,८३० रुपये आणि तृतीय श्रेणीचा दर २,०४० रुपये.
वांद्रे टर्मिनस येथून प्रथम श्रेणीतील तिकीट दर ५,४४५ रुपये, द्वितीय श्रेणीचा दर ३,२३० रुपये, आणि तृतीय श्रेणीचा दर २,३०० रुपये
सीएसएमटी येथून प्रथम श्रेणीतील तिकीट दर ५,०२५ रुपये, द्वितीय श्रेणीचा दर २,९९० रुपये आणि तृतीय श्रेणीचा दर २,१६० रुपये

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2019 11:03 am

Web Title: new rajdhani express on delhi mumbai route know ticket fare timings route and all other details
Next Stories
1 जानेवारीतच तळ गाठला, मराठवाड्यात भीषण पाणीटंचाईची शक्यता
2 पाल क्षेत्री खंडेरायाचा विवाह उत्साहात
3 इस्लामपूरमध्ये गावगुंडांची शहराच्या मुख्य मार्गावरून धिंड
Just Now!
X