03 March 2021

News Flash

पश्चिम घाटात पालींच्या चार नव्या प्रजातींचा शोध

या चार पालींचा शोध लागण्यापूर्वी या कुळातील सुमारे १३५ प्रजाती अस्तित्त्वात आहेत.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

भारतातील तसेच अमेरिकेतील संशोधकांनी पश्चिम घाटात पालीच्या चार नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. निमास्पीस लिमयी, निमास्पीस अजिजा, निमास्पीस महाबली आणि निमास्पीस एम्बोलीएन्सीस अशी त्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या चारही पाली निमास्पीस या कुळातील आहेत. त्यापैकी ‘निमास्पीस लिमयी’हे नाव संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे माजी संचालक व वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या नावावरुन ठेवण्यात आले  हे विशेष.

निमास्पीस कुळातील या चार पालींचा शोध लागण्यापूर्वी या कुळातील सुमारे १३५ प्रजाती अस्तित्त्वात आहेत. त्यापैकी २९ प्रजाती या भारतातील आहेत. अमित सय्यद, रॉबर्ट अलेक्झांडर पायरन आणि आर. दिलीपकुमार या संशोधकांचा त्यांच्या संशोधनावरील पेपर शुक्रवार, २४ ऑगस्टला अमेरिकेतील ‘अ‍ॅम्फिबियन अँड रेपटाईल कन्झर्वेशन’मध्ये प्रसिद्ध झाला. पश्चिम घाटातील या नव्या प्रजातीच्या वर्णनावरून या जनुकांतर्गत येणाऱ्या प्रजातींच्या समृद्धीबद्दल असलेली माहिती अजूनही अपूर्णच आहे, असे मत या संशोधनानंतर संशोधकांनी व्यक्त केले आहे. अफ्रिका तसेच आशियात आढळून येणाऱ्या पालींच्या कुळातील निमास्पीस हे एक कुळ आहे, असे पुण्यातील वन्यजीव संरक्षण आणि संशोधन संस्थेचे संशोधक अमित सय्यद यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. पश्चिम घाटात अशा प्रजातींचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

अमित सय्यद यांचे संशोधन

अमित सय्यद यांचे पालींवर संशोधन आहे. यातूनच त्यांनी महाराष्ट्रात या चार प्रजाती शोधून काढल्या. त्यांच्यात अनुवंशिक काय फरक आहे हे शोधून काढण्यासाठी त्यांना इतर दोघांनी सहकार्य केले. मागील वर्षीच त्यांनी अमेरिकन जर्नलला हा पेपर दिला. वरिष्ठांनी त्यावर पुन्हा काम करुन शुक्रवार, २४ ऑगस्टला तो प्रसिद्ध केला.

‘‘अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांच्या कामाची पद्धत आणि स्वभाव गुण खुप आवडला. भविष्यात काहीतरी मोठे काम करु तेव्हा त्यांचे नाव देऊ हे ठरवले होते आणि आता ती संधी मला मिळाली. गुरुला ही गुरुदक्षिणा देता आली. अजिजा सय्यद हे आईचे नाव असून ‘निमास्पीस अजिजा’असे नाव एका प्रजातीला दिले. ‘निमास्पीस महाबली’हे नाव भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण संस्थेचे सेवानिवृत्त वैज्ञानिक अनिल महाबळ यांच्या नावावरुन दिले. अंबोलीतून एक पाल  सापडल्याने तिला ‘निमास्पीस एम्बोलीएन्सीस’, असे नाव दिले.’’    -अमित सय्यद, संशोधक, वाईल्डलाईप प्रोटेक्शन अ‍ॅन्ड रिसर्च सोसायटी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 28, 2018 1:03 am

Web Title: new species of lizard
Next Stories
1 जिल्हा परिषद निवडणुकांवर तीन महिन्यांसाठी अप्रत्यक्ष स्थगिती
2 राज्यात महिला शौचालयांची संख्या वाढवा
3 पंतप्रधानांना राखी बांधण्यासाठी आदिवासी महिला दिल्लीत
Just Now!
X