जल्लोषी वातावरणामध्ये सरत्या वर्षांला निरोप देतानाच नववर्षांचे स्वागत करण्यात आले. बुधवारची रात्र धमाल वातावरणात शहरासह जिल्हयात साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे प्रथमच पहाटेपर्यंत जल्लोष सुरू असला तरी त्यास पोलिसांनी हरकत घेतली नव्हती. मात्र तळीरामांवर करडी नजर ठेवून बेधुंद वाहन चालविणाऱ्यांना पोलिसी हिसका दाखविला गेला.
३१ डिसेंबरची रात्र शहरात जल्लोषी वातावरणात साजरी केली जाते. त्यासाठी शहरातील हॉटेल्स व परिसरातील धाब्यांमध्ये खास सोय करण्यात आली होती. तेथे खवय्यांची गर्दी झाली होती. काहींनी फार्महाऊस मध्ये नववर्षांचे स्वागत केले. बुधवारी दिवसभरात पाण्यासारखी देशी-विदेशी दारू विकली गेली. वाईनशॉप रात्री १ वाजेपर्यंत तर परमिटरूम पहाटे पाच पर्यंत सुरू होते. मद्यपींवर कारवाई करण्याचा इशारा उत्पादनशुल्क विभागाने दिला असल्याने अनेकांनी या विभागाकडून एक दिवसाचा मद्यपरवाना घेतला होता.
सोशल मीडियावरही नववर्षांच्या शुभेच्छा दिल्या गेल्या. शुभेच्छांमुळे मध्यरात्री संदेशामुळे संदेशबॉक्स भरून गेले होते. मध्यरात्री १२ वाजणेच्या सुमारास फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली. आवाजाच्या मर्यादा सांभाळत तरूणाई संगीतावर डोलत होती. तर, दिवसभरात नववर्षांसाठी भेट देण्यासाठी पेन, डायरी, दिनदíशका यांची खरेदी झोकात झाली.