News Flash

नवजात मुलीला करोनाची लागण, जव्हार रुग्णालयात उपचारासाठी रवाना

पंधरा तासापूर्वी जन्माला आलेल्या नवजात मुलीला करोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे. 

निखील मेस्त्री, पालघर

पंधरा तासापूर्वी जन्माला आलेल्या नवजात मुलीला करोनाची लागण झाल्याची बाब समोर आली आहे.  नवजात बालकाला करोना झाल्याची पालघर जिल्ह्यातील ही पहिलीच घटना समोर आली असून पुढील उपचारासाठी या बलिकेला जव्हार येथे पाठविण्यात आले आहे.

पालघर तालुक्यातील दारशेत येथील रहिवासी अश्विनी काटेला असे मातेचे नाव आहे. या मातेची पालघर शहरातील एका खाजगी रुग्णालयात मुदतपूर्व प्रसूती झाली होती. जन्माला आलेले नवजात बाळ वजनाने कमी असल्याने तिला पालघरमधील दुसऱ्या एका रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. तेथे या बाळाची प्रतिजन चाचणी सकारात्मक (पॉझिटिव्ह) आली. माता मुदतपूर्व प्रसूत झाल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत, असे त्या खाजगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटले आहे. मातेची करोना प्रतिजन चाचणी मात्र नकारात्मक (निगेटिव्ह) आहे.

बालक मुलीला करोना असल्याचे समोर आल्यानंतर पालघर ग्रामीण रुग्णालयात तिला आणले गेले. तेथे तिच्यावर प्राथमिक उपचार करून जव्हार ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेने पाठविण्यात आले आहे. बाळाची प्रकृती स्थिर असली तरी काही गुंतागुंत असलंयाने त्यावर जव्हार रुग्णालयात उपचार देणे सोयीचे जाईल असे ग्रामीण रुग्णालयात असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 10:24 pm

Web Title: newborn girl infected corona rushed jawahar hospital treatment ssh 93
Next Stories
1 Coronavirus : राज्यात दिवसभरात करोनाबाधितांपेक्षा दुपटीहून अधिक रूग्ण करोनामुक्त!
2 संभाजीराजे यांच्या आरोपावर गृहमंत्री वळसे पाटील यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले..
3 पाळतीच्या आरोपाबाबत संभाजीराजे यांनी केला खुलासा, म्हणाले…
Just Now!
X