आज राज्यात ४ हजार ३९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १७ लाख ६६ हजार १० रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.६० टक्के इतके झाले आहे. आज राज्यात ३ हजार ४४२ नवीन रुग्णांचं निदान झालं आहे. तर राज्यात आज ७० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी १८ लाख ६ हजार ८०८ नमुन्यांपैकी १८ लाख ८६ हजार ८०७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५ लाख २४ हजार ५९ व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ४ हजार ३१६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आज घडीला राज्यात ७१ हजार ३५६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आज राज्यात ३ हजार ४४२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १८ लाख ८६ हजार ८०७ इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या ७० मृत्यूंपैकी ४७ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत तर २३ मृत्यू मागील आठवड्यातील आहेत अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.