News Flash

दुचाकींच्या अपघातात नवदाम्पत्यासह तिघे ठार

कुंदा गावडे हिच्या काकाचे निधन झाल्यामुळे गोपाल व कुंदा दुचाकीने ब्रिडी या गावाकडे जात होते.

गडचिरोली : दुचाकींची समोरासमोर धडक होऊन नवदाम्पत्यासह तिघे जण जागीच ठार झाल्याची दुदैवी घटना अहेरी येथील प्राणहिता पोलीस मुख्यालयाजवळ सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. गोपाल रघुनाथ महतो, कुंदा इरपा गावडे रा. अहेरी व संतोष गट्ट दुडलवार रा. जिमलगट्टा, अशी मृतकांची नावे आहेत.

कुंदा गावडे हिच्या काकाचे निधन झाल्यामुळे गोपाल व कुंदा दुचाकीने ब्रिडी या गावाकडे जात होते. आल्लापल्ली- अहेरी मार्गावरील प्राणहिता पोलीस मुख्यालयाजवळ गोपाल व संतोष यांच्या दुचाकी वाहनांची समोरासमारे धडक लागली. यात गोपाल महतो व संतोष दुडलवार हे दोघेही जागीच ठार झाले. दरम्यान, गोपालचा मृत्यू झाल्याचे कुंदा गावडे हिच्या लक्षात येताच तिला जबर मानसिक धक्का बसला. तिला तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने नागपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. नागपूर येथे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे गोपाल आणि कुंदा यांनी काही दिवसांपवर्ूीच कायदेशीररित्या विवाह केला होता. लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी दोघांच्याही कुटुंबीयांनी जून महिन्यात अहेरी येथे विवाह सोहळय़ाचे आयोजन केले होते. दोघेही आनंदात विवाहाची तयारी करीत असताना अचानक त्यांच्यावर काळाने झडप घातली. मृतक गोपाल महतो हा अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2019 4:21 am

Web Title: newly married couple died in road accident in gadchiroli
Next Stories
1 प्रणिता बोराचे चित्र पंतप्रधान कार्यालयात झळकले!
2 बारामतीत आंतरजातीय विवाहाच्या वादातून मुलीचा खून ; आई अटकेत
3 ९५ हजार दुबार मतदार?
Just Now!
X