20 September 2018

News Flash

Video – पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात जादुटोणा

महिला बरी होण्यासाठी चक्क डॉक्टरांनीच आणलं मांत्रिकाला

उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेली महिला लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी चक्क डॉक्टरांनीच मांत्रिकाला पाचारण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. तर रुग्णालयानं मात्र असं काही झालं नसल्याचा निर्वाळा दिला आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल झालेल्या एका महिला रुग्णासंदर्भात हा प्रकार घडला आहे. सदर महिला मृत्यू पावली असून तिच्यावर चुकीची शस्त्रक्रिया झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

HOT DEALS
  • Micromax Dual 4 E4816 Grey
    ₹ 11978 MRP ₹ 19999 -40%
    ₹1198 Cashback
  • Honor 8 32GB Pearl White
    ₹ 12999 MRP ₹ 30999 -58%
    ₹1500 Cashback

छातीत गाठ झाल्याने रुग्णालयात दाखल झालेल्या या महिलेचा सोमवारी पहाटे मृत्यू झाला. संध्या सोनवणे असं या महिलेचं नाव आहे. या महिलेला आधी स्वारगेट येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तब्येत खालावल्याने त्यांना दीनानाथमध्ये हलवण्यात आले आणि आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्यावर जादुटोणा करण्यासाठी मांत्रिकाला पाचारण करण्यात आल्याचा आरोप तिच्या भावानंच केला आहे. डॉक्टर सतीश चव्हाण यांनी या मांत्रिकाला आणल्याचं व नजर उतरवण्यासाठी उतारा काढल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, बहिणीची तब्येत महत्त्वाची असल्यानं आपण त्याबाबत काही बोललो नाही असं या महिलेच्या भावानं पत्रकारांना सांगितलं. यासंदर्भातला हा व्हिडीयोही व्हायरल झाला असून त्यामध्ये एक व्यक्ती हातात फुल घेऊन ती त्या महिलेच्या अंगावरून उतारा केल्यासारखी फिरवताना दिसत आहे. तसंच या व्हिडीयोमध्ये नजर उतरवल्याचा संदर्भ अस्पष्ट ऐकायला येत आहे.

‘संध्या सोनवणे यांच्यावर चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया झाली. त्यात रक्तस्राव झाला आणि त्यांना जीव गमवावा लागला’, असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. शिवसेनेचे शहर संघटक सचिन तावरे यांनी तक्रार गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. डॉक्टर सतीश चव्हाण यांनी हे प्रकरण मिटवण्यासाठी आपल्याला फोन केला असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान रुग्णालय प्रशासनाने असा कोणताही प्रकार घडला नसल्याचा दावा केला आहे. ‘दिनानाथ रुग्णालय हे पुण्यातील एक नामांकित रुग्णालय आहे. त्यामुळे त्याठिकाणी असा प्रकार घडणे कदापी शक्य नाही. विनाकारण कोणीतरी ही अफवा पसरवत आहे. रुग्णालयात असा कोणताही प्रकार घडलेला नाही’, असं रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

तर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी हा मांत्रिक रुग्णाच्या नातेवाईकांनी बोलाविला की दीनानाथ रुग्णालयाने याची चौकशी व्हायला हवी असे सांगत संपूर्ण माहिती आल्यावरच बोलू असे म्हटले आहे.

First Published on March 13, 2018 3:05 pm

Web Title: news of black magic in dinanath mangeshkar hospital of pune