28 February 2021

News Flash

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोपी हनी बाबू अटकेत

एनआयए विशेष न्यायालयात हजर केलं जाणार हजर

संग्रहित

भीमा कोरेगाव एल्गार परिषद प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) आरोपी हनी बाबू यांना अटक करण्यात आली आहे. एनआयएने उत्तर प्रदेशातून अटकेची कारवाई केली आहे. ५४ वर्षीय हनी बाबू दिल्ली विद्यापीठात डिपार्टमेंट ऑफ इंग्लिशमध्ये सह-प्राध्यापक म्हणून काम करतात. हनी बाबू यांना उद्या बुधवारी एनआयए विशेष न्यायालयात हजर केलं जाणार आहे. यावेळी चौकशीसाठी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात पुणे आणि नोएडा पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्यांच्या घरावर छापा टाकला होता.

सीपीआय (माओवादी) या बंदी असलेल्या संघटनेने ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुणे येथे एल्गार परिषद आयोजित केली होती. त्यानंतर कोरेगाव भीमा येथे दोन गटात दंगल उसळली होती. याप्रकरणी १७ एप्रिल २०१८ रोजी पोलिसांनी पुणे, मुंबई आणि इतर ठिकाणी एकाच वेळी छापे घातले होते. त्यानंतर माओवाद्यांचा कथित संबंध प्रथम समोर आला होता.

पुणे पोलिसांनी याप्रकऱणी १५ डिसेंबर २०१८ रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं. तर २१ फेब्रुवारी २०१९ रोजी पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. २४ जानेवारी २०१० रोजी एनआयएने तपास हाती घेतला होता. १४ एप्रिल २०२० रोजी एनआयएकडून याप्रकरणी आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांना अटक करण्यात आली. तपास सुरु असताना आरोपी हनी बाबू नक्षलवादी उपक्रम आणि माओवादी विचारसरणीचा प्रचार करत असल्याचं तसंच इतर आरोपींसोबत कटात सहभागी असल्याचं समोर आलं होतं.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना २९ जुलै २०२० रोजी एनआयए विशेष कोर्टात हजर केलं जाणार असून यावेळी तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. याप्रकरणी अद्यापही तपास सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2020 8:04 pm

Web Title: nia arrests accused hany babu in bhima koregaon elgar parishad case sgy 87
Next Stories
1 मराठा आरक्षण सुनावणीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
2 चंद्रपूर : गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ४ ऑगस्टला शाळा सुरू करणार – वडेट्टीवार
3 राज्यात निवडणुका स्वतंत्र लढू,मग सत्तेसाठी शिवसेने सोबत एकत्र येऊ –  चंद्रकांत पाटील
Just Now!
X