25 September 2020

News Flash

अलिबाग येथे ३० डिसेंबरपासून नाइट क्रिकेट स्पध्रेचे आयोजन

या स्पध्रेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

माजी केंद्रीय कृषीमंत्री खा. शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त अलिबाग शहरातील क्रीडाभुवन येथे विद्युत झोतातील क्रिकेट स्पध्रेचे आयोजन ३० व ३१ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. या स्पध्रेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ७५ हजार इतकी रक्कम विजेत्या संघाला मिळणार आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रकाश धुमाळ यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. या वेळी जिल्हा विधी सेल अध्यक्ष अ‍ॅड. सुशील पाटील, अलिबाग-मुरुड मतदारसंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. जनार्दन पाटील, जिल्हा संघटक ऋषिकांत भगत, सुनील गुरव आदी उपस्थित होते. ३० डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता क्रीडाभुवन मदानावर होणाऱ्या या स्पध्रेकरिता राज्यातील निवडक १६ संघ सहभागी होणार आहेत. स्पध्रेचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वसंतराव ओसवाल उपस्थित राहणार आहेत.
या स्पध्रेत विजयी संघाला प्रथम क्रमांकास ७५ हजार ७५ रुपये व चषक, द्वितीय ५० हजार ७५ रुपये व चषक आणि इतर पारितोषिके देण्यात येणार आहेत. पारितोषिक वितरण युवानेते अनिकेत तटकरे, अदिती तटकरे, ज्येष्ठ नेते विजय कवळे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. राज्यातील मान्यवर खेळाडू काही संघांत खेळणार असून सुमारे १५ हजार प्रेक्षक उपस्थित राहण्याचा अंदाज आयोजकांनी वर्तविला आहे. या स्पध्रेच्या सुरुवातीलाच जिल्ह्य़ातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ७५ ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 2:00 am

Web Title: night cricket match in alibaug
Next Stories
1 मृत्यूनंतरही शरद जोशी यांची शेतकऱ्यांनाच दिलदार साथ!
2 दहशतवाद ही आíथक लढाईची आडपदास
3 वन्यजीव अभ्यासक शुभम आळवे यांना पुरस्कार
Just Now!
X