कोकण रेल्वेच्या समस्यांचा विसर पडल्याचा आरोप करीत माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यर्त्यांनी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या विरोधात आज रत्नागिरीत जोरदार निदर्शने केली.
रेल्वेमंत्री प्रभू आज रत्नागिरीच्या दौऱयावर आहेत. रत्नागिरीत आज प्रभूंचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आले आहे. दरम्यान, या कार्यक्रमाला जात असताना माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारूती मंदिराजवळ त्यांची गाडी रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, रेल्वेमंत्र्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न करणाऱया राणे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
माझ्या माहिती मध्ये असे आले कि रेल्वे मंत्री सुरेश प्रभू रत्नागिरी येथे आपले संपर्क कार्यालय सुरु करण्याच्या निमित्ताने रत्नागिरीस भेट देत आहेत.मुळात कोकणावर अन्याय होत असताना डबल डेकर हि ट्रेन रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यासाठी बंद केली.अशा परिस्थितीमध्ये आपण रेल्वे मंत्र्यांचे स्वागत कसे करणार? ज्या आपल्या वैयक्तिक संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी रेल्वे मंत्री येत आहेत त्या कार्यालयाची जागा हि रेल्वे प्रशासनाच्या मालकीची असून रेल्वे स्थानकाच्या हद्दीत येत आहे. शिवाय,कार्यालयाची देखरेख करणाऱ्या कार्मचारापैकी एक कर्मचारी हा रेल्वे प्रशासनाचा आहे.अ सा हा मनमानी कारभार आम्ही मुळीच सहन करणार नाही व वेळीच या हडपशाहीला रोखण्यासाठी उद्या दिनांक ४ जानेवारी २०१५ रोजी होणा-या कार्यालय उद्घाटनाच्या प्रसंगी मी स्वतः निदर्शन करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याबरोबर कोकणावर होणारा प्रत्येक अन्याय हाणून पडण्यासाठी यापुढेही प्रयत्नशील राहीन, असे निलेश राणेंनी यावेळी म्हटले.