News Flash

कोकणच्या मनातील सल दूर करण्यासाठी ‘या’ महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्या -निलेश राणे

"छत्रपती संभाजी महाराजांना कोकणात पकडले गेलं"

उद्धव ठाकरे आणि निलेश राणे

स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. यानिमित्नानं सोशल मीडियातून छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या जयंतीनिमित्तानं निलेश राणे यांनी राज्य सरकारडं एक मागणी केली आहे.

निलेश राणे छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त ट्विट केलं. ज्यात मुंबई-गोवा महामार्गाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्याची मागणी त्यांनी केली. “स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि अलौकिक आणि अद्भुत अशा कार्याचे निर्माते छत्रपती संभाजीराजे यांना कोकणात पकडले गेले. कोकणच्या मनातील ही सल दूर करण्यासाठी आणि त्यांना आदरांजलीसाठी मुंबई-गोवा महामार्गाचे छत्रपती संभाजीराजे शिवाजीराजे भोसले असं नामकरण व्हावं,” अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे.

मागणीचं ट्विट करण्यापूर्वी निलेश राणे यांनी महाराजांना अभिवादन करून शुभेच्छा दिल्या. “अखंड हिंदुस्थानचे स्फूर्तीस्थान, श्रीमंत छत्रपती संभाजीराजे महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा. सर्व शिवभक्तांना छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या शिवमय शुभेच्छा,” असं ट्विट निलेश राणे यांनी केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 3:03 pm

Web Title: nilesh rane demand rename mumbai goa high way as chhatrapati sambhaji raje bhosale bmh 90
Next Stories
1 अतुल भातखळकरांचा शिवसेनेविरोधात खोचक निशाणा
2 चिंताजनक : राज्यभरात एक हजार एक पोलीस करोना पॉझिटिव्ह
3 एकनाथ खडसे भडकले!, तिकीट नको म्हणून माझी मुलगी ढसाढसा रडत होती, का दिलं?
Just Now!
X