काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांना अपहरणानंतर मारहाण केल्या प्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांना सोमवारी खेड जिल्हा सह सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला.
गेल्या शुक्रवारी सकाळी नीलेश राणे पोलिसांना शरण आले होते. दुपारी त्यांना चिपळूण येथील प्रथमवर्ग न्यायाधीश प्रथमेश रोकडे यांच्यासमोर हजर करण्यात आले असताना, त्यांनी राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर जामिनासाठी करण्यात आलेला अर्जही त्यांनी फेटाळून लावला. त्यानंतर राणे यांच्या वतीने खेड येथील जिल्हा सह सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सोमवारी सुनावणी झाली.