News Flash

“अजित पवार पुन्हा नॉटरिचेबल होण्याची वेळ आलीये”; भाजपा नेत्याकडून राजकीय भूकंपाचा इशारा

"अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आलं नाही आणि ते.."

फाइल फोटो (फोटो सौजन्य: पीटीआय)

भाजपाचे नेते नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.  राजकीय वर्तुळामध्ये सुरु असणाऱ्या चर्चांचा संदर्भ देत निलेश राणे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड होणार असल्याचे संकेत ट्विटवरुन दिलेत.

निलेश राणे यांनी ट्विटरवरुन अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘अजित पवार यांना कधी मुख्यमंत्री होता आलं नाही आणि ते कधी होणार पण नाहीत,’ असा टोला निलेश यांनी लगावला आहे. तसेच ‘अजित पवार यांना कसंतरी उपमुख्यमंत्रीपद मिळालं होतं पण आता महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा आहे,’ असंही निलेश यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आलीय,’ असा उल्लेख करत निलेश यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार नॉटरिचेबल झाले होते हा जुना दाखला देण्याचा प्रयत्न केलाय. त्याचप्रमाणे निलेश यांनी आपल्या ट्विटमध्ये राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील तिसरा पक्ष असणाऱ्या काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे असंही म्हटलं असून उपमुख्यमंत्रीपद हा काँग्रेसचा हक्क असल्याचंही म्हटलं आहे.

मागील सव्वा वर्षाहून अधिक काळापासून राज्यात सत्तेत असणाऱ्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकासआघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद हे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे असून उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्याकडे आहे. निलेश राणे यांनी केलेला हा दावा राजकीय वर्तुळामध्ये सुरु असणाऱ्या चर्चेच्या आधारे केला असल्याचं सांगण्यात येत आहे.

आणखी वाचा- उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे जाणार? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

काही दिवसांपूर्वीच अजित पवारांनी साधला होता निशाणा

जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावरून विरोधकांकडून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचे प्रयत्न विरोधी पक्षांनी केला होता. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच निलेश राणे यांनी इतके गुन्हेगार मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत असा टोला राष्ट्रवादीला लगावला होता. यावर अजित पवारांनी लोकसत्ता ऑनलाइनशी बोलताना निलेश राणेंच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला होता. “ते काही बोलतात आणि त्यावर मी बोलायाचे का? पण एक सांगतो त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झालाय,” अशा शब्दांत अजित पवार यांनी निलेश राणेंवर निशाणा साधला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2021 4:43 pm

Web Title: nilesh rane slams ajit pawar says maharashatra will get 2 deputy cm soon scsg 91
Next Stories
1 जिल्ह्य़ात मत्स्योत्पादनात घट
2 पालघरमधील हुतात्मा स्तंभाची दुरवस्था
3 एकाच दिवशी दोन पदांवर नियुक्ती
Just Now!
X